•शाळा, कॉलेज व बसस्टँड भागात “भाऊ”लोकांचा ठिय्या
• पथकांचा फेऱ्या वाढणे गरजेचे अन्यथा अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण?
अजय कंडेवार,वणी:- शाळा ,महाविद्यालय व वणी बसस्टँडचा आवारात विद्यार्थिनींची छेड (Teasing of Female Students) काढणार्या सडक छाप रोडरोमियोंनी (Roadromiyo) उच्छाद मांडला आहे. त्यांच्या या उपद्रवने विद्यार्थिनी व पालक हैराण झाले आहेत. त्यांचा बंदोबस्त करावा अशी आर्त हाक पालकवर्गातून होत आहे.
शहरातील अनेक महाविद्यालयाचा मुख्य प्रवेशद्वार असो की प्रत्येक शाळा व बसस्टॅण्ड इथे विशेष रोडरोमियोनी ठीय्याच मांडला आहे.रोड रोमियो महाविद्यालयीन रस्ता व दुकान चाळ , पानठेले, या भागात उभे राहतात. त्यांचे अनेक थांबे तयार झाले आहे. शाळा कॉलेज सुटल्यानंतर व शाळा भरायच्या अगोदर हे रोडरोमिओ महाविद्यालयातून घरी चाललेल्या विद्यार्थिनींची टू व्हीलर वर पाठलाग करत डबल सीट व ट्रिपल सीट सुसाट वेगाने येत विद्यार्थिनींची छेड काढत असल्याने काही शाळा कॉलेजमधील काही विद्यार्थिनींना आपले शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आली . या रोडरोमियांचा बंदोबस्त केला नाही तर शाळा, महाविद्यालय व वणी बसस्टॅण्ड परिसरात अनुचित घटना घडण्याची होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील अनेक शाळा व महाविद्यालयात अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थिनी सायकल वर ये-जा करत असतात. या विद्यार्थिनींना रस्त्यावर अडवून छेड (Teasing of Female Students) काढण्याच्या घटना घडू लागल्या आहेत परंतु कोणीही समोर येऊन सांगण्यास तयारही होत नाही आहे . कारण त्या रोडरोमियोला काही म्हटल्यास तो काहीही करून देणार याकडेही शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी विचार करतात.परंतु याकडे महाविद्यालय प्रशासन,शाळा प्रशासन पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे. एखादी अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण राहील यामुळे पालक वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली असून नाराजी व्यक्त होत आहे. बाहेर खेड्यातून येणाऱ्या अनेक विद्यार्थिनींनी या रोडरोमिओ यांची चांगलीच धास्ती घेतली असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे.