•रस्त्याचा कामाचे भूमिपूजन संपन्न.
•मतदारसंघातील सर्व रस्त्यांचे नुतनीकरण आणि मजबुतीकरण करण्याचे ध्येय- आ. बोदकुरवार
अजय कंडेवार,वणी:-आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नाने शहरातील सेवानगर येथे काँक्रिट रस्ता व नाली बांधकाम “विशेष निधी अंतर्गत”मंजूर करून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार तसेच मान्यवरांचे हस्ते 28 सप्टें. गुरुवार रोजी भूमिपूजन करण्यात आले.
आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते भूमिपूजन..
वणी नगर परिषद हद्दीतील स्मशानभूमी ते माळीकर वेल्डिंग दुकानापर्यंत 45 लाख रू किमतीचा भूमिगत नाली व सिमेंट काँक्रीट रस्त्याचा कामाचे भूमिपूजन “विशेष निधी अंतर्गत”मंजूर करून करण्यात आलें.वणी मतदारसंघातील सर्व रस्त्यांचे नुतनीकरण आणि मजबुतीकरण करण्याचे ध्येय असताना यासोबतच परिसरातील गावांच्याही सर्व समस्या लवकरच सोडविल्या जातील अशी ग्वाही आ.संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी भूमिपूजनाचा प्रसंगी दिली. विशेषतः येत्या काळात वणी विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करून नक्कीच कायापालट होणार त्यात काहीही शंका नाहीच असाही विश्वास स्थानिकांनी दर्शविला.
या कार्यक्रमाचे उदघाटक संजीवरेड्डी बोदकुरवार (आमदार, वणी विधानसभा क्षेत्र),कार्यक्रमाचे अध्यक्ष तारेंद्रजी बोर्डे (माजी नगराध्यक्ष),प्रमुख उपस्थिती म्हणून दिनकर पावडे (संचालक, इं. सह. सुतगिरणी पेटूर),विजय पिदुरकर(माजी जि.प.सदस्य),रवी बेलूरकर (जिल्हा सरचिटणीस), संजय पिंपडशेंडे (वणी विधानसभा प्रमुख),गजानन विधाते ,ललित लांजेवार व परिसरातील समस्त नागरीक मंडळी उपस्थित होते.