•न्याय सर्वांसाठी समान असलाच पाहिजे, प्रशासन राजकीय दबावाखाली का ?
•खाटीक समाजाची मागणी.
अजय कंडेवार,वणी :- शहरातील मुख्य बाजारपेठेत सुदधा मटन विक्री चालू असताना त्यांना काही त्रास न देता हेतु परस्पर काही ठिकाणीं कारवाई करून काही दुकानदारांनाच त्रास दिला जात आहे. हे तर उमगणारे कोडच आहे. असा स्पष्ट आरोप खाटीक समाजाने केले आहे.Delete all meat/chicken shops in the city and relocate them to one place तसेच मांस विक्री व चिकन दुकान हटवायचे असेल तर संपूर्ण वणी शहराचे दुकान हटवून एकाच ठिकाणी (Meat/Chicken Shop) स्थलांतर करण्यात यावे अशी मागणी मुख्याधिमार्फत जिल्हाधिकारी यांना दिं.9 मार्च रोज गुरूवार रोजी देण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे.
शहरातील आठवडी बाजारात मागील 20 से 30 वर्षापासून मटन (मांस) विक्रीचे दुकाने आहे. या परिसरात अनेक वर्षापासून व्यवसाय सुरू देखील आहे.याच व्यवसायावर खाटीक समाजांचे उदरनिर्वाह आहे . या व्यवसायामुळे वणीकर जनतेला कोणताही त्रास झाला नाही होत परंतु काही राजकीय लोकांचा दबावाखाली नगर प्रशासन मांस विक्रीचे दुकान हटविण्याकरिता नाहक त्रास देणे सुरू केले आहे असे आरोपही निवेदनातून केले आहे.वणी शहरातील मुख्य बाजारपेठेत सुदधा मटन विक्री चालू असताना त्यांना काही त्रास न देता हेतुपरस्पर कारवाई देखील जत्रा मैदानात होताना दिसत आहे .मटन दुकानावर कारवाई तर चिकन दुकानावर का नाहीं? हे तर उमगणारे कोडच आहे. असाही स्पष्ट आरोप खाटीक समाजाने निवेदनातून केलें आहे. असे हेतूपरस्पर कारवाया राजकीय दबावाखाली केल्या जात आहे का?असाही घणाघाती आरोप केला आहे. असे जर होत असेल तर दुकाने हटविल्यास उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकरण्यात येत नाही.
समस्त खाटीक समाजाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आपल्याला मांस विक्री व चिकन दुकान हटवायचे असेल तर पूर्ण वणी शहराचे दुकान हटवून एका ठिकाणी स्थलांतर करण्यात यावे. परंतु काही दुकाने हटवून अन्याय करू नये व बेरोजगार करू नये. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनाचा प्रत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य , मुख्याधिकारी न.प.वणी ,पोलिस स्टेशन वणी,तहसिलदार वणी यांना पाठविण्यात आले.
निवेदनावर सह्या कुनाल लोणारे, दिनेश हिकरे, अश्फाक कुरेशी, रोशन लोणारे, जीवन ढोक, कैलाश ढोक, नवनाथ रारोकार, अब्दुल शेख, इस्माईल शेख, मोहन रारोकार युसुफ शेख, नरेश पारवे आहेत.