• अन्यथा शिवसेना युवासेनेचे तिव्र आंदोलन.
• नगरपालिका प्रशासन मुंग गिळून का ?
•एकतर मटण मार्केट अधिकृत करा व उघड्यावरील दुकाने बंद करा.
अजय कंडेवार,वणी:- शहरातील उघड्यावर असलेल्या अवैद्य मांस विक्रेत्यांचे दुकान बंद करण्याबाबतचे वारंवार निवेदन देऊनही नगर परिषद कारवाई करीत नसल्याने जनतेचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्याकरिता शहरातील उघड्यावर मांस विक्रीवर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी उबाठा गटाचे युवासेना वणी शहर प्रमुख कुणाल रा. लोणारे यांनी वणी नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. शहरातील मुख्य चौकात व काही भागातील रस्त्यावर राजरोसपणे मांस विक्री होत आहे.वणी शहरात मटण मार्केट हे गावाबाहेर तसेच मैदानात असल्याने या मांस विक्री दुकानाचा सर्वसामान्य जनतेला कोणताही त्रास होत नाही.या मांसची दुर्गंधी व जनतेचे आरोग्य लक्षात घेऊनच प्रशासनाने या व्यवसायाची अधिकृतरित्या परवानगी देण्यात आलेल्या ठिकाणीच दुकाने मांडावी परंतु आता ही मांस विक्रीची दुकाने शहरातील मध्यभागी तसेच रस्त्यावरच विविध ठिकाणी अवैधरित्या लावण्यात आली आहे. या दुकानांचा जनतेला त्रास नक्कीच होत आहे. शिवाय नियमाला डावलून सदर दुकाने लावण्यात आली आहे. याबाबत अनेकदा नगरपालिकेला निवेदन देण्यांत आले तसेच नगर परिषदेला तक्रार करण्यात आली. परंतु या गंभीर समस्येकडे नगरपरिषद जाणिवपूर्वक लक्ष देत नाही.नगरपालिका मूंग गिळून का? असा सवाल उपस्थित होत आहे.
शहरातील रोडवर मांस विक्रीची दुकाने रस्त्यावर लागतात. त्यामुळे किरकोळ अपघातांसह पिसाळलेल्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. या रस्त्यावर असलेल्या मास दुकानाचा सडलेल्या मांसाच्या दुर्गंधीने परिसरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे मांस विक्रीची दुकाने मटण मार्केटमध्ये स्थलांतरित करुन रस्त्यावरील मांस विक्री कायमची बंद करावी. अन्यथा शिवसेना युवासेनेच्या माध्यमातुन तिव्र आंदोलन करण्यात येईल व त्यामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेस नगर परिषद, प्रशासन जबाबदार राहील असा स्पष्ट इशारा निवेदनातून उबाठा गटाचे युवासेना वणी शहर प्रमुख कुणाल रा. लोणारे व समस्त युवासेनेने दिला आहे.