अजय कंडेवार,वणी :- शालेय किडा व शिक्षण विभाग व्दारा आयोजित, तालुकास्तरीय कीडा स्पर्धा (२०२३-२४) अंतर्गत १७ वर्षा खालील मुलांच्या अंतीम व्हॉलीबॉल सामन्यात लायन्स इ.मिडीयम हायस्कूलचा संघ विजेता तर मुलीचा व्हॉलीबॉल संघ उपविजेता ठरला.
शाशकीय मैदानावर दि. १२ सप्टेंबर २०२३ रोजी लॉयन्स हायस्कूल व शि.प्र. मं. विदयालय दरम्यान खेळल्यागेलेल्या अंतीम सामन्यात लॉयन्स हायस्कूलचा संघ यवतमाळ जिल्हास्तरासाठी पात्र ठरला या विजयी संघात. सौम्या खैरे (कर्णधार), सक्षम काकडे, अथर्व कोनप्रतिवार, नयन गिरटकर, मंथन हेपट, किश वरारकर, यथार्थ छल्लानी, शिवतेज ठाकरे, मुजम्मिल शा, श्रेयश पाचभाई, हिमांशू कुचनकर यां विजेता व उपविजेता व्हॉलिबॉल खेळाडुंचे, पालक व किडा शिक्षकांचे वणी लॉयन्स चॅरीटेबल संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार उपाध्यक्ष लॉयन बलदेव खुंगर, सचिव लॉयन सुधिर दामले कोषाध्यक्ष चंद्रकांत जोबनपुत्रा सदस्य लॉयन शमीम अहमद, नरेंद्र बरडिया, किशन चौधरी, महेंद्र श्रीवास्तव, राजाभाऊ पाथ्रडकर, प्राचार्य प्रशांत गोडे, दिपासींग परीहार यांनी अभिनंदन केले.