• पत्रकारांसाठी घेतलेल्या कार्यशाळेला भरगच्च अशी गर्दी
•पत्रकारिता क्षेत्रात आयुष्य वेचणाऱ्या पत्रकारांचा मरणोपरांत सन्मान व जीवनगौरव पुरस्कार देण्यात आले..
अजय कंडेवार,वणी :- व्हॉइस ऑफ डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचा वतीने वसंत जीनिंग हॉल, वणी येथे 25 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय कार्यशाळा व 26 फेब्रुवारी रोजी उद्घाटन समारंभ थाटात संपन्न झाले.
या उद्घाटन सोहळ्याला लोकसत्ताचे संपादक, प्रसिद्ध विचारवंत, व्याख्याते देवेंद्र गावंडे उद्घाटक वक्ते होते, तर तरुण भारत डिजिटल मीडियाचे संपादक शैलेश पांडे यांचे अध्यक्षतेखाली उद्घाटन सोहळा संपन्न झाले. तसेच प्रमुख अतिथी सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर (खासदार-वणी चंद्रपुर-आर्णी,लोकसभा क्षेत्र), हंसराज अहिर (अध्यक्ष ,राष्ट्रीय ओबीसी आयोग, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री, भारत सरकार),संजीवरेड्डी बोदकुरवार (आमदार, वणी विधानसभा क्षेत्र),राजू उंबरकर(राज्य उपाध्यक्ष, मनसे),विजय चोरडिया (प्रदेश कार्यकारीणी सदस्य, भाजपा) व आशीष खुलसंगे(अध्यक्ष दि. वसंत जिनिंग को. सो, वणी) हे होते. परंतू विशेष अतिथी म्हणून जिनिंग वणीचे अध्यक्ष आशिष खूलसंगे, तृप्ती उंबरबकर, अल्का टेकाम, वंदना आवारी, यांची उद्घाटन सोहळ्याला विशेष उपस्थिती होती.
नवोदित पत्रकार, पत्रकारिता क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या आणि समाजातल्या जाणत्या वर्गासह शिक्षक, वकील यांच्यासाठी ” एक दिवशीय कार्यशाळेचे “ आयोजन करण्यात आले होते.कार्यशाळेचे उदघाटक म्हणून आशिष खुलसंगे (अध्यक्ष-दि वसंत जिनिंग को. ऑप. सो. वणी),कार्यक्रमाचे अध्यक्ष राजु उंबरकर (राज्य उपाध्यक्ष-महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वणी) व प्रमुख अतिथी म्हणून पी.एस.आंबटकर (संचालक MSPM’S ग्रुप),तारेन्द्र बोर्डे (माजी नगराध्यक्ष न.प. वणी),संजय खाडे (अध्यक्ष रंगनाथस्वामी अर्बन निधी लि. वणी तथा संचालक वसंत जिनींग अॅण्ड प्रसिंग फॅक्टरी वणी),शोभना मॅम हे उपस्थिती होते. प्रसिद्ध प्रमुख वक्ते दिपक गोविंद रंगारी हे होते.ते मराठी भाषा व्याकरण व प्रसार माध्यम यावर अतिशय सुंदर असे व्याख्यान केले तसेच वक्ते कल्याण कुमार हे देखील प्रसिद्ध व्याख्याते डिजिटल मिडीया आणि कायदा या विषयावर व्याख्यान सोप्या व साद्या भाषेत केले.डिजिटल मिडिया म्हणजेच न्युज पोर्टल आज माध्यमांच्या दुनियेत क्रांती करीत असुन जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घटना तत्काळ जनतेपर्यंत पोहचविण्याचे मोलाचे कार्य ह्या माध्यमातून सुरू असून केंद्र शासनाने डिजिटल मिडीयाला मान्यताही दिली आहे . माध्यमात कार्य करताना डिजिटल मिडिया प्रतिनिधींना येणाऱ्या अडचणी, पत्रकारिता कायदे तसेच बातम्यांचे अचुक व सुयोग्य विश्लेषण करण्याच्या संदर्भात पत्रकारांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूने व्हॉईस ऑफ डिजिटल मिडिया अधिवेशन आयोजित केले होते.या माध्यमातून डिजिटल मिडीयाचे अस्तित्व व महत्व प्रभावीपणे पटवून देणे, पत्रकारांचे मजबूत संघटन तयार करणे तसेच डिजिटल पत्रकारांना प्रशिक्षण देणे हा ह्या अधिवेशनाचा मुख्य उद्देश होता तो यशस्वीही झाला.
“वणीत प्रथमच पत्रकार ,वकील, शिक्षक व जाणत्या वर्गासाठी पहिल्यांदाच आयोजित करण्यात आले होते . या कार्यशाळेत वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील पत्रकार तसेच पत्रकारिता क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली.व्हॉइस ऑफ डिजिटल मीडियाच्या वतीने आयोजित या उद्घाटन सोहळ्यात पत्रकारिता क्षेत्रात आयुष्य वेचणाऱ्या पत्रकारांचा मरणोपरांत सन्मान व जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आले. पत्रकारितेत स्वतःला वाहून घेणाऱ्या पत्रकारांच्या सहचरणीला त्यांचा मरणोपरांत सन्मान म्हणून साळी चोळी, सन्मान चिन्ह व सन्मान राशी देण्यात आली तर आपली संपूर्ण हयात पत्रकारितेत घालविणाऱ्या पत्रकारांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव सुध्दा करण्यात आले.
.
असा हा आगळा वेगळा उद्घाटन सोहळा वणी येथे रंगला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अध्यक्ष राजु निमसटकर यांनी केले . तसेच या कार्यक्रमाचा यशस्वितेसाठी संघटनेच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.