•SC चा निर्णयाचे मनसेकडून स्वागत.
अजय कंडेवार,वणी:- दसरा दिवाळीपूर्वी दुकानांवर मराठी पाट्या लावून व्यावसायिक उलाढाल वाढविण्याची हीच वेळ आहे, असा सल्ला देत सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने मुंबईसह राज्यातील व्यापाऱ्यांना दोन महिन्यांत दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले. या समर्थनार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, वणी येथे महाराष्ट्र सैनिकांच्या वतीने जल्लोष करण्यात आला.गेल्या वर्षी राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावण्याचे आदेश जारी केले होते. त्यास फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने न्यायालयात आव्हान दिले होते. दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत असाव्यात हा आदेश अतार्किक आहे. राज्य सरकार भाषेच्या बाबत दुकानदारांवर मोठ्या आर्थिक भुर्दडाची सक्ती लादू शकत नाही, असा युक्तिवाद याचिकादारांनी केला होता.
या निकालाविरुद्ध व्यापारी संघटनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सुनावणी करताना मराठी पाट्या लावण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देताना सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी डिसेंबरपर्यंत स्थगित केली. सुप्रीम कोर्टाने व्यापाऱ्यांना मराठी पाट्या लावण्याचा आदेश दिल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकित पुतळ्यासमोर जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी राजू उंबरकर यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करून आभार व्यक्त केले. सर्व व्यापाऱ्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे पालन करून सहकार्य करावे. या लढ्याला यश मिळाल्याने महाराष्ट्र सैनिकांसह मला मनस्वी आनंद झाला आहे, असे मत यावेळी व्यक्त केले.
“