व्यवसाय शिक्षणाने उद्योजक बना – पि.एस. आंबटकर
•शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) येथे जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनी…….
अजय कंडेवार, वणी :- आधुनिक जगात टिकाव धरू शकणारे व्यवसाय शिक्षण घ्या. रोजगार मागण्यापेक्षा व्यवसाय शिक्षण घेऊन आपल्यासह इतरांसाठीही रोजगाराची निर्मिती करा,असे आवाहन महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर चेअरमन पि. एस. आंबटकर यांनी केले.
महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, कार्यालय, चंद्रपूर यांचे व्दारे आयोजित जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनी दि.2 डिसें.ला सकाळी 11 वाजता शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), जिल्हाधिकारी यांच्या निवास स्थानाजवळ, सिव्हील लाईन, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले.
त्यात जिल्ह्य़ाचे प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कल्पना खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली एमआयडी चंद्रपूर चेअरमन मधुसूदन रुंगठा यांचा हस्ते पार पडले. तसेच शासकीय कार्यक्रमात प्रमुख पाहणे म्हणून महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर चेअरमन पि.एस. आंबटकर,जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर चे सहायक संचालक भैय्याजी येरमे हे होते.
आधुनिकीकरणामुळे बेरोजगारीची समस्या वाढत आहे. एकीकडे उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वाढत्या आधुनिकीकरणाबरोबर रोजगाराची संख्या दिवसेंदिवस कमी होत जाईल. अशावेळी बेरोजगार उमेदवार आणि उपलब्ध नोकरींचा ताळमेळ जमणे कठीण जात आहे. यासाठी प्रत्येकाने कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे. आपला देश हा तरुणांचा देश आहे आपल्याकडे ६० टक्के देशाची लोकसंख्या ही ३५ वर्षे वयापेक्षा कमी आहे. राज्यात उद्योगनिर्मितीला चांगले वातावरण आणि तरुण लोकसंख्येचे प्रमाण यामुळे आता राज्यात मोठे उद्योग स्थापन करण्यावर भर देण्यात येत आहे. यामुळे व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे.’ जिल्ह्यात शिक्षण संस्था तसेच अनेक व्यावसायिक संस्थांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रात्यक्षिकांची माहिती प्रदर्शनात देण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अभ्यासक्रमनिहाय संस्थांची माहितीदेखील विद्यार्थ्यांना देण्यात आली. शेवटी या जिल्हास्तरीय व्यवसाय प्रदर्शनीला भेट देऊन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रात्यकक्षिकांची पाहणी करून त्यांना प्रोत्साहन दिले.