•पोउनी आशिष झिंमटे व, पो. कॉ.शुभम सोनुले व टीमने लावला गुन्ह्याचा छडा…..
अजय कंडेवार, वणी:-तालुक्यातील नांदेपेरा येथील शेतकऱ्याचा कापूस चोरल्याच्या आरोपावरून वणी पोलिसातील पोउनी आशिष झिंमटे , पोलिस कॉन्स्टेबल शुभम सोनुले व त्यांचा टीमने 6 आरोपींना अवघ्या काही तासातच अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला 915 किलो कापूसही पोलिसांनी हस्तगत केला. या शिवाय चोरीत वापरलेली महिंद्रा पिकअप व्हॅन, असा 4 लाख 21 हजार 599 रुपयाचा ऐवज जप्त केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील नांदेपेरा येथे एका शेतकऱ्याचे १३ एकर शेती असुन शेतामध्ये एक बंडा आहे. त्याच बडयात शेतातील ४० क्विटल कापूस ठेवला होता .शेतातील बडयातून दि. ०५/०२/२०२३ रोजीच्या रात्री अंदाजे ०३ ते ०४ क्विंटल व दि. ०७/०२/२०२३ रोजी रात्री अंदाजे ०५ ते १० क्विटल असा अंदाजे १४ क्विंटल कापूस प्रती क्विं.अ. ८,०००/- रु. प्रमाणे एकूण ०१ लाख १२ हजार रुपयाचा दि. ०५/०२/२०२३ रोजी ते दि. ०७/०२/२०२३ दरम्यान ४ ते ५ अज्ञात आरोपी विरोधात दिनांक 8 फेब्रू ला. वणी पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला. परंतू वणी पोलीसांनी या कापूस चोरणाऱ्यासाठी विशेष टीम घेउन तपासाचे चक्रे फिरविली असता अवघ्या काहीं तासातच या विशेष टीमने त्या कापूस चोरांचा मुस्कटदाबी करीत आरोपी १) अंकीत संजय सोयाम (वय २२ वर्ष ) रा. पोहना ,२) अविनाश दिलीप ठावरी (वय ३५ वर्ष ) रा. नादेपेरा, ३)अजय रामदास दडाजे (वय २४ वर्ष) रा.नादेपेरा (पोहना), ४) अनिकेत सुभाष चिक्कटे (वय २५ वर्ष ) रा. नांदेपेरा (५) सचीन उध्दव पेंदोर (वय ४५ ) रा. नांदेपेरा ( पोहना) ६) अशोक बाबाराव मेश्राम (३२ वर्ष) रा. नांदेपेरा यांना जेरबंद करीत त्यांचावर रितसर वणी पोलीस स्टेशन येथे विविध कलमांतर्गत ३८०, ४६१, ३४ भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.तसेच या सहा आरोपींना पोलीस कोठडी देखील 13 फेब्रु पर्यंत घेण्यात आली आहे.
सदर कारवाई डॉ. पवन बनसोड (पोलीस अधिक्षक यवतमाळ) पियुष जगताप (अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ), संजय पुज्जलवार (उप.वि.पो.अ.वणी) ठाणेदार पो.नि प्रदिप शिरसकर यांचे मार्गदर्शनात करण्यात आली या गुन्हयाचा तपास पोउपनि आशिष झिमटे, पो. कॉ. शुभम सोनुले ,सागर सिडाम,पो कॉ प्रफुल नाईक हे करीत आहे.