•तीन जागीच ठार , एक गंभीर
माणिक कांबळे /मारेगाव :- वृत्तपत्राची पार्सल पोहचवीणाऱ्या ओमनी कारला एका ट्रकने आमने सामने जबर धडक दिल्याने तीन जन जागीच ठार झाले असून एक गंभीर जखमी झाल्याची दुर्देवी घटना आज सकाळी 11जुलैचे सकाळी 6वाजता राज्य महामार्गावरील कोठोडा गावा जवळ घडली.Damaged of newspaper parcel car.Three killed on the spot, one seriously.
नागपूर वरून निघणाऱ्या दैनिक वृत्तपत्राच्या पार्सल पोहच करणाऱ्या ओमनी कार क्रमांक M H 34 K 1954 ही आज11जुलै ला नेहमी प्रमाणे सकाळी मारेगाव येथे वृत्तपत्र पार्सल देत पांढरकवडा कडे रवाना झाली होती.
राज्य महामार्गांवरील कोठोडा पुला जवळ करंजी कडून मारेगाव कडे येत असलेल्या ट्रक ने या कारला जबर धडक दिली.या अपघातात कारचा चेंदामेंदा होऊन यातील चालक ,वाहक व एक प्रवासी असे तिघे जन जागीच ठार झाले.मात्र यातील एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याला पांढरकवडा येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.किशोर बोरकर रा.आनंद चौक वरोरा जिल्हा चंद्रपूर असे अपघातात ठार झालेल्या कार चालकाचे नाव आहे.
उर्वरित मृतक व जखमी चे नाव कळू शकले नाही.उत्तनीय तपासणी करिता मृतदेह पांढरंकवडा येथे हलविण्यात आले आहे. पांढरकवडा पोलीस पुढील तपास करीत आहे.