• अन्यथा…येत्या 5 दिवसात सरपंचासह ग्रामस्थ पुकारणार एल्गार.
अजय कंडेवार,वणी :- झरी तालुक्यातील मुकुटबन येथील वीज उपकेंद्रात परिसरात वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याने परिसरातील ग्रामस्थ वैतागले आहे. त्याकरिता (दि.12 एप्रिल) मुकुटबन ग्रा.पं .सरपंचा मीना आरमुरवारसह ग्रामस्थ यांनी शाखा अभियंता महा.राज्य विद्युत मंडळ शाखा ,मुकुटबन यांना देण्यात आलेल्या निवेदनातून विज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.Frequent power outages; The villagers were upset! Otherwise…Elgar will call Sarpanch in next 5 days
भर तापत्या उन्हात वीज पुरवठा खंडित होत असल्याने परिसरात ग्रामस्थांमध्ये विद्युत महामंडळाबद्दल प्रचंड रोष निर्माण होत आहे. परिसरात उन्हाचा तडाका असल्यामुळे नागरिक उकाड्यापासून त्रस्त आहेत. रात्रभर विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती निर्माण झाली आहे. गावात अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे तसेच वीजपुरवठा ड्रीप होत असल्यामुळे गावातील मोटर जळण्याची दाट शक्यताही आहे. ट्रान्सफार्मर या भागाची भार सहन करण्यास सक्षम नाहीत. त्याचबरोबर मेटन्ससाठी आलेला निधीचा वापर झालेला नाही. ट्रान्सफार्मर व तारेवरील वेली, झाडे, झुडपे तोडलेली नाही. त्यामुळे हि समस्या निर्माण होत आहे. गावातील इलेक्ट्रिक तार ची अवस्था फार बिकट आहे.
मुकुटबन उपकेंद्रात बऱ्याच दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क केल्यास उडवाउडवीचे उत्तर मिळत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी स्वतः सरपंच मीना आरमुरवार यांचसह ग्रामस्थ कडून होत आहे. येत्या 5 दिवसात समस्या दूर झाले नाही तर समोरील होणाऱ्या बाबीं स्वतः विद्युत विभाग जबाबदार राहील. असा दम निवेदनातून देण्यात आला. यावेळी उपस्थित म्हणून ग्रामस्त उपस्थित होते.