Tuesday, February 17, 2026
HomeBreaking Newsविश्वास आणि निष्ठेमुळेच संस्थेची प्रगती — अध्यक्ष अ‍ॅड. देविदास काळे 

विश्वास आणि निष्ठेमुळेच संस्थेची प्रगती — अध्यक्ष अ‍ॅड. देविदास काळे 

•मुकुटबन येथे उत्साहपूर्ण सदस्य मेळावा पार पडला.

Ajay kandewar, Wani : आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ या विशेष औचित्याने,श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.,वणी यांच्या वतीने दि. ५ ऑक्टोबर २०२५, रविवार रोजी मुकुटबन येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात भव्य आणि उत्साहपूर्ण सदस्य मेळावा पार पडला. या मेळाव्याचा मुख्य हेतू संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेणे, सहकाराच्या मूल्यांचा प्रसार करणे आणि सभासदांशी संवाद साधणे हा होता. सभासदांच्या उपस्थितीने आणि प्रतिसादाने संपूर्ण वातावरण सहकारमय झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. देविदास काळे होते, तर प्रारंभीची प्रस्तावना संस्थेचे उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर यांनी सादर केली. त्यांनी संस्थेचा उदय, कार्यपद्धती आणि भावी विकासाची रूपरेषा यावर सविस्तर प्रकाश टाकला.प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले प्रा. कवडूजी नगराळे (तज्ञ संचालक, यवतमाळ जिल्हा सहकारी बोर्ड) यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून ‘सहकारातून समृद्धी’ या संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकास, आर्थिक स्वावलंबन आणि समाजनिर्मितीतील भूमिका स्पष्ट करत, सभासदांना अधिक सक्रिय सहभागाचे आवाहन केले.मेळाव्याचा आकर्षणबिंदू ठरला तो सत्कार समारंभ. संस्थेच्या आर्थिक स्थैर्य व प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या उत्कृष्ट ठेवीदार, कर्जदार आणि अभिकर्त्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यांच्या विश्वास, निष्ठा आणि समर्पणामुळेच संस्थेने सहकार क्षेत्रात ठसा उमटविल्याचे अध्यक्षांनी नमूद केले. या सत्काराने सर्व सभासद आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले.यानंतर संस्थेचे संचालक पुरुषोत्तम बद्दमवार यांनी आपले मनोगत व्यक्त करत सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन भावी योजनांची माहिती दिली.समारोपात अध्यक्ष अ‍ॅड. देविदास काळे यांनी संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेत, भविष्यातील विकासधोरणे मांडली. “सहकार हीच खरी समाजसमृद्धीची गुरुकिल्ली आहे आणि संस्था याच मार्गावर दृढपणे वाटचाल करत राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी व्यासपीठावर लिंगारेड्डी अंडेलवार, परिक्षीत एकरे, सुधीर दामले, हरिशंकर पांडे, रमेश भोगळे, सुरेश बरडे, अ‍ॅड. घनश्याम निखाडे, डॉ.भुपाळराव पिंपळशेंडे, चिंतामण आगलावे,उदय रायपुरे, अरविंद ठाकरे,सुनिल देठे,छाया ठाकूरवार आणि निमा जीवने आदींची मान्यवर उपस्थिती होती.विशेष उपस्थित मान्यवरांमध्ये वीरभद्र पाटील, राजूभाऊ कासावार, राजूभाऊ येलटीवार, प्रकाश कासावार, संदीप बुर्रेवार, भूमारेड्डी बाजनलवार, केशवराव नखाले, विवेक गोडे, मारोतराव गौरकर, अंकुश माफूर आणि उत्तमराव गेडाम यांचा समावेश होता.

मेळाव्याचे संपूर्ण नियोजन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दोरखंडे व शाखा व्यवस्थापक अमोल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.प्रवीण नांदे आणि अमोल मांडवकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले, तर पायल परांडे यांनी सुरेख सूत्रसंचालन केले.कार्यक्रमाच्या शेवटी संचालक सुरेश बरडे यांनी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments