•आत्महत्याग्रस्त कुटूंबाला भेट देवून,अतिवृष्टीच्या नुकसानीचे करणार पाहणी
नागेश रायपूरे, मारेगाव:- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांची सांत्वनपर भेटी व अतिवृष्टीमुळे नुकसानीच्या पाहणी करिता राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज 19 सप्टेंबर रोजी यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर येत आहे.या दौऱ्या दरम्यान मारेगाव तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबाच्या सांत्वन भेटी घेवुन अतिवृष्टी च्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.
यात दुपारी 12 वाजता दापोरा परिसरातील अतिवृष्टीच्या नुकसानीचे पाहणी करणार आहे. 1 वाजता दरम्यान बोरी (गदाजी) येथील पुंडलिक रोयारकर या आत्महत्याग्रस्त कुटूंबाची सांत्वन भेट तसेच 2 वाजता दरम्यान दांडगाव परिसरातील अतिवृष्टी नुकसानीची पाहणी व तोताराम चिंचुलकर या आत्महत्या ग्रस्त कुटूंबाची सांत्वन भेट तसेच 3 वाजता दरम्यान वनोजादेवी येथे अतिवृष्टी नुकसानीची पाहणी करुन त्यांचा ताफा वरोरा मार्ग नागपूर कडे रवाना होणार आहे.