अजय कंडेवार,वणी:- वणी लॉयन्स चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने संचालित तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत वणी येथे लॉयन्स विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक सत्र नियमित अध्यापन वर्गाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत झाली. याप्रसंगी आमदार बोदकुरवार यांनी वणी परिसरातील विज्ञान शाखेच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मर्यादित असल्यामुळे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहात होते. त्यामुळे वणी लॉयन्स चॅरिटेबल ट्रस्टने पुढाकार घेत विज्ञान व वाणिज्य शाखेचे पदवी वर्ग सुरू केले. तेव्हा विद्यार्थ्यांनी प्राप्त संधीचे सोने करून जीवनात उज्ज्वल यश प्राप्त करावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
अध्यक्षस्थानी लॉयन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शमीम अहमद तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे, विद्यालयाचे सचिव महेंद्र श्रीवास्तव, कोषाध्यक्ष रमेश बोहरा, संचालक बलदेव खंगर, विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत गोडे, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य दीपासिंह परिहार उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी प्रबळ इच्छाशक्ती अंगी बाळगल्यास हमखास यश मिळते असे मनोगत डॉ. प्रसाद खानझोडे यां व्यक्त केले. प्रारंभी महाविद्यालयाच्या अध्यक्षा दीपासिंह परिहार यांना वरिष्ठ महाविद्यालयाचा पदभार सोपविला.