Ajay Kandewar,(Wani):- तालुक्यातील विदर्भा नदीपात्र व पैनगंगा नदी पात्रात नेरड, पुरड, कुंड्रा, चिलई, तेजापुर व आमलोन गावातील रेती चोरटे मोठया प्रमाणात अवैध रेतीचा उपसा करुण चढया दराने छोटे बांघकाम करणाऱ्या गरजू व सामान्य जनतेला वेठीस धरून विक्री होत आहे, तरी तेथील संबधित तलाठी व मंडळ अधिकारी हे डोळेझाक करीत त्यांना स्पष्ट सहकार्य करून शासनाचा तिजोरीला सुरुंग लावण्याचे कार्य हे महसूल विभागाचा झारीतील शुक्राचार्य करीत असल्याची मोठी बोंब आहे.हे रेती चोरटे अवैध रेती उपसा करून सामान्य नागरीकांची लुट करणाऱ्या माफीयाकडे मात्र याकडे महसुल अर्थपूर्ण डोळेझाक करीत असल्याची चर्चा जागरूक नागरिकांमधून होत आहे.
अवैध रेती उपसा करणारे मोठया प्रमाणात सक्रीय तालुक्यात सिंचन विहीर व पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजनेची मोठया प्रमाणात बांधकाम (Construction) सुरू असुन त्याचे बांधकाम करण्यासाठी रेतीची गरज आहे .हीच बाब हेरुन नेरड,पुरड,कुंड्रा,चिलई,तेजापुर व आमलोन गावातील रेती चोरटे अवैध रेती उपसा करुन योजनेअंतर्गत बांधकाम करणाऱ्या सामान्य नागरीकांना चढया दराने सहा हजार रुपये ब्रास रेतीची विक्री करुन लुट चालविली आहे. तालुक्यातील विदर्भा नदीपात्र व पैनगंगा नदी पात्रात त्यामुळे अवैध रेती उपसा करणारे मोठया प्रमाणात सक्रीय झाले असुन दिवसा पहाटे व रात्री रेतीची ट्रॅक्टरने(tractor) रेती घाटावरून रेतीचा उपसा करून वाहतूक (Transportation) सुरू आहे.
या अवैध रेती उपसा करणाऱ्यानी तंत्रज्ञानाच्या (Technology) युगात महत्वाच्चा ठीकाणी मोठे नेटवर्क उभारले असुन रात्रभर अवैध रेतीची वाहतुक करुन मोठया प्रमाणात उपसा चालवीला जात आहे आणि सकाळी 9 वाजेपर्यंत सूरू असते. मात्र याकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने शासनाचा तिजोरीला लाखोंचा चूना लावण्यात झारितील “ते दोन तलाठी ” यांच्या सिहांचा वाटा दिसून येतं असल्याचे स्पष्ट चित्र आहे तसेच योजनेमधील बांधकांम करणाऱ्या शेतकरी व नागरीकांची आर्थिक लुट सुरू आहे. रात्रीच्या सुमारास विदर्भा नदीपात्र व पैनगंगा नदी पात्राततुन रात्रीच्या वेळी रेती उपसा ट्रॅक्टरने चोरीने वाहतूक राजरोस सुरू आहे. मात्र याकडे प्रशासनाचे अर्थपुर्ण दुर्लक्ष होत आहे.
“आता यावर आळा विदर्भ न्युज करणार यात संशय नाहीच. या प्रकरणाला जिल्हाधिकारी यांचा दालनात “विदर्भ न्युज करणार” पुरावे गोळा केले असले तरीही आणखी”ते दोन ” तलाठ्यांच्या शिरजोरपणा शासनापुढे मांडणार आहे. आणि “किती मध्ये यांची सेटिंग” हे सुद्धा एका “ऑडियो कॉल” ने उघड लवकरच भाग 2 मध्ये करणार आहे.”