•60 वर्षाची परंपरा कायम….
अजय कंडेवार ,वणी:- तालुक्यातील सर्वात मोठ्या गावात फ्री मेथॉडिस्ट राजूर चर्चचा ख्रिस्त बांधवांनी रविवार दिनांक (9 एप्रिल 2023) “ईस्टर संडे” अर्थात ‘प्रभू येशू खिस्तांच्या पुनरुत्थानाचा दिवस’ खिश्चन समाजबांधवांनी मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला. गावातील शेकडो ख्रिस्त समाजबांधवांनी समाधीस्थळातील प्रांगणात प्रातःकाल भेट देत तेथील सर्व समाधिंना पुष्पहाराने सजविण्यात आले. संपूर्ण विदर्भात केवळ राजूर या गावातच प्रात:कालची प्रार्थना समाधीस्थळातील प्रांगणात मागील 60 वर्षापासून होते, हे विशेष उल्लेखनीय! In Vidarbha, only “This…” village offers prayers at the mausoleum…! 60 years of tradition forever….
दरम्यान, दरवर्षी पाल्म संडे,गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे निमित्त काढण्यात येते. दिंडी आणि शांतीयात्रा यावेळी अतिशय उत्साहात करण्यात आली. मागील रविवारी प्रभू येशू खिस्तांच्या यरुशलेम प्रवेशानिमित्त जगभरात ‘पाल्म संडे’ अर्थात झावळ्यांचा रविवार साजरा करण्यात आला.तसेच “उत्तम शुक्रवारी” येशू ख्रिस्ताला मानव जातीचा उद्धारासाठी वधस्तंभावर खिळन्यात या त्यानंतर अखिल मानवजातीच्या पापक्षालनासाठी प्रभू येशूने क्रूसखांबावर दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून जगभरात (7 एप्रिल रोजी) गुड फ्रायडे अर्थात उत्तम शुक्रवार हा सण साजरा करण्यात आला आणि रविवार (दि .9 एप्रिल) रोजी येशूच्या पुनरुत्थानानिमित्त ईस्टर संडे हर्षोल्हासात साजरा झाला. फ्री मथोडीस्ट चर्च राजूर कॉलनी येथील पास्टर गिरीष शिरमनवार यांनी ईस्टर निमित्त बायबलमधील वचनांच्या आधारे संदेश दिला. यावेळी चर्चच्या महिलांनी, मुलांनी प्रभू येशूंच्या पुनरुत्थानाबाबत गीते सादर केले. यावेळी फ्री मेथॉडीस्ट चर्च प्रांगणात भोजनविधीही समस्त बांधवांतर्फे आयोजित करीत आला .
या साठी केली आजची प्रार्थना…..
“देशात चालत असलेल्या घडामोडीसाठी प्रातःकालीन प्रार्थना रविवारी पहाटे सहा वाजता प्रभू येशू खिस्तांच्या पुनरुत्थानानिमित्त समाधीस्थळातील प्रांगणात राजूरचा फ्री मथोडीस्ट चर्चचे समस्त सदस्य उपस्थित होऊन प्रात:कालच्या प्रार्थनासभेत सहभागी झाले. अशाप्रकारची प्रात:कालची प्रार्थना संपूर्ण विदर्भात केवळ राजूर या गावातच होते, हे उल्लेखनीय! यावेळी पुनरुत्थान झालेल्या येशुकडे जगाला कोरोनाच्या संकटातून मुक्त करण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. इंग्रजांच्या काळापासून अस्तित्वात असलेल्या राजूर गावातील चर्च मध्ये ईस्टर संडे निमित्त आनंदाचे वातावरण पसरले होते. “
या कार्यक्रमाचा यशस्वीतेकरिता चर्चचे पास्टर तथा कमिटीचे अध्यक्ष, समस्त कमिटी सदस्य,युवा कमिटी व शेकडो समाजबांधव उपस्थित होते.