•शेतकऱ्यांकडून एक हजार रु मागणी प्रकरण..
अजय कंडेवार,वणी:- जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय पिदुरकर यांनी ५ सप्टेंबरला केलेल्या तक्रारीमुळे या गंभीर प्रकरणाचा भंडाफोड झाला आहे. ५. सप्टेंबरला वणीचे तालुका कृषी अधिकारी सुशांत माने यांनी मुंबईतील रिलायन्स जनरल इंश्युरन्सश कंपनीचे राज्यप्रमुख प्रमोद पाटील व कंपनीचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नीलेश जाधव यांच्याकडेही एक पत्र पाठविले.Vijay Pidurkar has “ransacked” the “surveyors”
त्यामध्ये वणी शेतकऱ्यांनी कंपनीकडे ऑनलाइन तक्रार केली. त्यावरून मुंबईतील कंपनीच्या शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचे सर्वेक्षण नेमणूक केली. दरम्यान, वणी तालुक्यातील पिकांच्या नुकसानीमुळे विमा प्रमुखांनी नुकसानग्रस्त करण्यासाठी काही सर्वेक्षकांची एनक येथे राजेश शामराव गारघाटे या शेतकऱ्याच्या सर्वेक्षकाला सर्वेक्षणाची विनंती केली होती. मात्र, गारघाटे यांना सदर सर्वेक्षकाने पिकाच्या पाहणीसाठी एक हजारांची रक्कम मागितल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्या अनुषंगाने ५ सप्टेंबरला विमा कंपनीचे टिमलीडर मारोती कदम यांनी तक्रारीची पडताडणी केली असता, त्यांनाही या तक्रारीत सत्यता आढळून आली. सर्वेक्षक अभिषेक पतंगे यांनी नसानग्रस्तकऱ्यांकडून पिकाच्या सर्वेक्षणाकरिता पैशांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले, असे प्रथमदर्शनी अहवालात नमूद केले आहे. सर्वेक्षकाकडून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक व मानसिक त्रास होऊ नये, म्हणून तालुका कृषी अधिकारी माने यांनी सर्वेक्षक पतंगे यांना तत्काळ कामावरून कमी करण्याची शिफारस ५ सप्टेंबरच्या पत्रान्वये रिलायन्स कंपनीच्या राज्यप्रमुखाकडे केली आहे. जिल्हा कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे, पांढरकवड्याचे उपविभागीय कृषी अधिकारी तसेच वणीच्या तहसीलदारांसह विजय पिदुरकर पत्र पाठविन्यात आलें.
“अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे नुकसान झाले असताना एका शेतकऱ्याने सर्वेक्षणासाठी रिलायन्स जनरल इंश्युरन्स कंपनीकडे तक्रार केली.त्या कंपनीकडून सर्वेक्षणासाठी सर्वेक्षक नेमण्यात आला.मात्र,सर्वेक्षकाने सर्वेक्षणासाठी एक हजारांची मागणी केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले सर्वेक्षकांची आहे.त्यातूनच सदर सर्वेक्षकाला कामावरून कमी करावे, अशी शिफारस वणीचे तालुका कृषी अधिकारी सुशांत माने यांनी रिलायन्स विमा कंपनीच्या राज्यप्रमुखाकडे केली आहे.”