•नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन..
सुरेंद्र इखारे,वणी -येथील प्रतिष्ठित व सेवाभावी सराफा व्यापारी व भाजपा प्रदेश सदस्य विजयबाबू चोरडिया यांचा वाढदिवस 2 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर 2022 रोजी विविध कार्यक्रमांनी श्रीनिवास मंगल कार्यालय छोरिया टाऊनशिप ,गणेशपूर येथे साजरा करण्यात येणार आहे.
2 सप्टेंबर ला श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती द्वारा सायंकाळी 6.00 वाजता सुमधुर गीतांचा आर्केस्ट्रा व रात्री 9.00वाजता महाप्रसाद तर सायंकाळी 7.00वाजता इंर्व्हील क्लब ऑफ डायमंड सिटी वणी तर्फे गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप, 3 सप्टेंबर शनिवारला प्रभू राम जन्मोत्सव समिती वणी द्वारा सकाळी 10.00ते4.00 वाजता नेत्र चिकित्सा व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबीर, लता मंगेशकर हॉस्पिटलनागपूर यांच्या सहकार्याने निशुल्क रोग निदान शिबीर घेण्यात येणार आहे.
यामध्ये हृदय रोग ,स्त्रीरोग, बालरोग, सर्जरी,अस्थीरोग, नाक-कांन-घसा ,नेत्ररोग, चर्मरोग, व इतर आजारावर उपचार केले जाईल व संपूर्ण औषधे श्रवण यंत्र व पुढील उपचार पूर्णतः निःशुल्क केले जातील. विशेषतः शिबिरात येणाऱ्या सर्व रुग्णाकरिता चहापाणी, व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच 4 सप्टेंबर ला वाढदिवसाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.