देव येवले,झरी: वणी मुकुटबन मार्गावर नवरगाव जवळ आज दुपारी १ वाजताच्या सुमारास दोन दुचाकी व टिप्परचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात प्रभाकर घुगुल (६०) यांचा जागीच मृत्यू झाला. असून मृतक हा झरी तालुक्यातील बोपापूर येथील रहिवाशी असल्याचे समजते.
वणी मुकुटबन मार्गावरील नवरगाव या गावाजवळ विटा घेवून येणाऱ्या टिप्परने दुचाकी स्वारास वाचविण्याकरिता अचानक ब्रेक मारल्याने टिप्पर पलटी झाला. यामध्ये स्कुटी क्र. (MH29AJ2578) ला स्प्रेडर ने मागच्या बाजूने धडक दिली असल्याचे बोलले जात आहे. घटनेमुळे मार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूकीचा खोळंबा झाला. स्प्रेडर दुचाकी स्वार घटनस्थळावरून पसार झाला असून, या भीषण अपघातात प्रभाकर घुगुल यांचा घटना स्थळीच मृत्यू झाला.
मृतकाचे शव उच्चस्तरीय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविले असून या सदर घटनेचा तपास शिरपूर पोलीस स्टेशन करत असून, अज्ञात फरार दुचाकी स्वारावर गुन्हा नोंद केला की नाही हे वृत्त लिहे पर्यंत कळू शकले नाही.