Tuesday, February 17, 2026
HomeUncategorized"विक्की सेठ"ला Overconfident पण.......

“विक्की सेठ”ला Overconfident पण…….

Ajay Kandewar :- शहरातील पत्रकार रवी ढुमणे यांच्या आत्महत्येने संपूर्ण वणी शहर सुन्न झाले असतानाच, या प्रकरणाने आता अत्यंत गंभीर आणि धक्कादायक वळण घेतले आहे. आत्महत्येनंतर समोर आलेले व्हॉट्सॲप संदेश, सुसाईड डायरीतील नोंदी आणि आता मिळालेला नवीन पुरावा यामुळे एका व्यक्तीचे नाव पुन्हा एकदा ठळकपणे चर्चेत आले आहे… ते नाव म्हणजे विक्की सेठ. विशेष म्हणजे नवीन एक गबाड बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे.

घटनेनंतर लगेचच उपलब्ध झालेल्या सुसाईड डायरीत व डिजिटल पुराव्यांत एका विशिष्ट व्यक्तीकडे स्पष्ट इशारा असतानाही अद्याप थेट गुन्हा दाखल न होणे, यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हा मुद्दा चौकशीचा भाग असल्याचे सांगितले जात असले,  तरी विक्की सेठ चा Overconfident वरून वरिष्ठ पातळीवरून “विक्की” वर कारवाईची ‘टांगती तलवार’ घट्ट केल्याचे संकेत आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत, अशी जोरदार चर्चा शहरात रंगली आहे.शहरात कथित फसवणूक, लोकांची आर्थिक घडी विस्कटणारा आणि मोठा फ्रॉड अशी ओळख असलेला एक विक्की सेठ, हा धोकेबाज असल्याच्या चर्चा नागरिकांच्या तोंडी उघडपणे ऐकू येत आहेत. अशातच, पत्रकार रवी ढुमणे यांच्या घरी आणखी एक महत्त्वाचा पुरावा मिळाल्याने या प्रकरणाला नवे बळ मिळाले आहे. या पुराव्यामुळे विक्की सेठच्या मानेवर कायदेशीर कारवाईची तलवार अधिकच धारदार झाल्याचे संकेत मिळत आहेत.

विशेष म्हणजे, नातेवाईकांनी आता आक्रमक भूमिका घेत थेट एका वरिष्ठ मंत्र्यांची भेट घेतली असून, या प्रकरणातील सर्व उपलब्ध पुरावे त्यांच्यासमोर सादर करण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या स्तरावर हस्तक्षेप झाल्याने, विक्की सेठला ‘मोठ्या गचक्यात अडवण्याचा’ प्रश्न थेट उभा ठाकला आहे, असे चित्र निर्माण झाले आहे.या संपूर्ण घडामोडींमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, आता पुढील काही दिवसांत मोठी आणि निर्णायक कारवाई होणार का?की अजूनही सत्य झाकण्याचा प्रयत्न होणार?.

थेट मंत्रालयात एका महत्त्वाच्या मंत्र्यांना सविस्तर माहिती….

विक्की सेठ प्रकरणात मोठी आणि खळबळजनक घडामोड समोर आली आहे. या प्रकरणासंदर्भात थेट मंत्रालयात एका महत्त्वाच्या मंत्र्यांना सविस्तर माहिती देण्यात आल्याची विश्वासार्ह माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, यावेळी केवळ तोंडी माहितीच नव्हे तर विक्की सेठ यांच्या कथित भूमिकेशी संबंधित आणखी काही ठोस पुरावे संबंधित मंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आल्याचे समजते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments