•मॅकरून शाळेत कार्यशाळेचे आयोजन.
अजय कंडेवार,वणी:- मोटार वाहन अपघातांना आळा बसावा व वाहतूक नियमांचा प्रचार व प्रसार होण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत दि.20 ऑगस्ट रोजी मॅकरून स्टूडेंटस् अकॅडमी शाळेत वाहतूक विभागामार्फत येथे चालक व विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा, वाहतूक नियम याबाबत प्रबोधन करण्यात आले.
या कार्यक्रमात मोटार वाहन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत विशेष भर देण्याबाबतचे सभुपदेशन करण्यात आले.या नियमात वाहन चालविताना मोबाईल वापर, अतिवेगाने वाहन चालविणे, क्षमतेपेक्षा अधिक भराची वाहतूक, मद्य प्राशन करून वाहन चालविणे, चोरटी वाहतूक, सीट बेल्ट आणि हेल्मेट बाबत वाहतूक पोलिस सोबत कारवाई करण्यात आला.
चालकांना विशेष माहिती वाहतूक विभागातर्फे देण्यात आले. 1 ) विहित मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे यात दोषी आढळल्यास 90 दिवस वाहन चालकांचे लायसन्स निलंबित होणार. 2 ) सिग्नल तोडल्यास.. 90 दिवस वाहन चालकांचे लायसन्स निलंबित होणार. 3 ) मालवाहू वाहनात मर्यादा पेक्षा जास्त वाहतूक केल्यास 90 दिवस वाहन चालकांचे लायसन्स निलंबित होणार. 4 ) माल वाहनातून प्रवासी वाहतूक करणे 90 दिवस वाहन चालकांचे लायसन्स निलंबित होणार. 5 ) दारू किंवा अंमली पदार्थ सेवन करून गाडी चालविल्यास 180 दिवस वाहन चालकांचे लायसन्स निलंबित होणार. 6 ) वाहन चालविताना मोबाईल वापरल्यास 90 दिवस वाहन चालकांचे लायसन्स निलंबित होणार. या सहित दंड असे स्पष्ट माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापिका शोभना मॅडम ,तर कार्यक्रमाचे उद्घाटक वणी वाहतूक शाखेचे प्रमुख( ए.पी.आय )संजय आत्राम हे होतें.तसेच कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून गोपाल हेपट (एन.सी.पी) हेही मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अदिती येवले आणि शर्वरी बोडके यांनी केले.तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रेया शेरकी यांनी केले.या कार्यक्रमाचा यशस्वीतेकरीता सुधीर लडके व नितेश कुरेकार व अन्य शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले.