• मनसेच्या वतीने मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलादुन्नबीचा शुभेच्छा.
अजय कंडेवार,वणी :- शहरात ईद-ए-मिलादुन्नबी अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. या सनानिमित्त काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेतील सहभागी मुस्लिम समाज बांधवांना व परिसरातील जनतेला मनसे वाहतूक राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी मनसे नेते राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनात लाडू वाटप करून शुभकामना देण्यात आल्या. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजूभाऊ उंबरकर यांची विशेष उपस्थित होती.
वणी शहरात मध्यभागी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पूर्णांकित पुतळ्यासमोर मागील अनेक वर्षापासून ईद निमित्त लाडू वाटपाचा कार्यक्रम मनसे कडून घेण्यात येतो. या कार्यक्रमात सर्व पदाधिकारी व शहरातील मुस्लिम समाजातील सर्व मान्यवर सहभागी होतात. यावर्षी सुद्धा ईद-ए-मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात मनसे वाहतूक राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी लाडू वाटप करीत ईद साजरी केली.
या कार्यक्रमात नवनिर्माण वाहतूक सेनेचे वणी शम्स सिद्दिकी,असलम खान,आकाश दूधकवडे ,युनूस सय्यद ,अयाज खान,जोहर हुसेन,इरफान खान, राजा मीस्त्री,फाल्गुन गोहोकर तालुका अध्यक्ष व शिवराज पेचे शहर अध्यक्ष व यांच्यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.