Ajay Kandewar,Wani:- शहरात वाहतूक कोंडीतून वाट काढत पुढे जाणाऱ्या वणीकरांना अधून-मधून बेशिस्त वाहन चालकांचाही त्रास सहन करावा लागतो आहे आणि जीवही गमवावे लागत असल्याने वणी वाहतूक पोलिसांनी या बेशिस्तांना ‘चाप’ लावण्यासाठी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे, बेशिस्तांची संख्या वाढत आहे. त्यातही शाळकरी मुले अन् टवाळखोरांकडून ट्रिपलशीट, मॉडीफाय सायलेन्सर तसेच अल्पवयीन दुचाकी चालक हे सुसाट धावत असल्याचे चित्र आहे व अवैध चारचाकी प्रवासी वाहने त्यावर वणी वाहतूक पोलिसांकडून करडी नजर ठेवून त्यावर जबरदस्त कारवाईचा बडगा उगारला असल्याचे दिसून येत आहे.
सुसाट धावकांना वारंवार सूचना देऊनही वाहनचालकांकडून अनेकदा वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. काही हुल्लडबाज तरुणांकडून कर्णकर्कश हॉर्न लाऊन गाड्या पळवणे, विना कागदपत्राच्या गाड्या चालवण्याचे प्रकारही घडतात. अशा बेजबाबदार वाहनचालकांवर वणी वाहतूक शाखेच्या प्रमूख API सिता वाघमारे यांनी अखेर कारवाईचा जबरदस्त बडगा उगारला आहे.वणी शहरात वाहनधारकांची कसून तपासणी करण्यात येत आहे.शहरातील चौकाचौकांमध्ये पोलिसांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत असून यात विना नंबर प्लेट, कर्णकर्कश सायलेन्सर, विना कागदपत्र वाहन अशा वाहनधारकांवर कारवाई करत दररोज 5 ते 10 वाहने जप्त करण्यात येत असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
•बेजबाबदार वाहनचालकांना चाप बसणार…..
“वणी वाहतूक पोलीसांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे वाहन चालकांमध्ये धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले. या कारवाईमुळे चोरी झालेली अनेक वाहन मिळून येणार आहेत मात्र ही कारवाई अशीच सुरू राहावी, अशी देखील अपेक्षा करण्यात येत आहे. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या नागरिकांवर देखील कारवाई करण्यात येत आहे.दरम्यान, या कारवाईने बेजबाबदार वाहनचालकांना चाप बसणार आहे. दारू पिऊन वाहन चालवताना आढळून आल्यास तर वाहनाच्या परवाना रद्द करण्यात येणार आहे त्यामुळे आता फॅन्सी नंबर प्लेट, विना नंबर प्लेट, विना कागदपत्र आणि दारू पिऊन वाहन चालवल्यास महागात पडणार आहे.
•अन्यथा वाहन मालक (पालक) यांच्यावर कायदेशीर कारवाई…..
“18 वर्षा खालील मुलांना (विद्यार्थांना)लायसंस नसलेल्या पाल्यांना मोटर सायकल चालवण्यास देऊ नये अन्यथा वाहन मालक (पालक) यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल ,याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.”- API सीता वाघमारे (वणी वाहतूक पोलीस प्रमूख).