•५६ लाख ७१ हजार रू.दंड वसुल.
•पांढरकवडा शहरात गरजूंना हेल्मेटचे वाटप
अजय कंडेवार वणी:- यवतमाळ जिल्ह्यात अपघातात होणारे मत्यु टाळण्याकरीता यवतमाळ जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.पवन बनसोड,अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप,Dysp रामेश्वर वेजने,जि.वा.शा यवतमाळ P .I अजित राठोड यांच्या सुचेनेने १० फेब्रुवारी रविवारी रोजी जिल्हा वाहतुक नियंत्रन उपशाखा पांढरकवडा तसेच गुरुकुल इंग्लिश मिडीयम शाळा ,पांढरकवडा व नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडीया यांच्या वतीने पांढरकवडा शहरात संयुक्त ट्राफीक नियम जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
विद्यार्थ्यांनी रविवारी शहरातील विविध चौकात पथनाट्याद्वारे वाहतूक नियमांबाबत जानजागृती केली. यावेळी त्यांनी हात जाेडतो, वाहतुकीच्या नियमांचे पालन करा, असे आवाहन नागरिकांना केले. पांढरकवडा शहर वाहतूक विभागातर्फे आयोजित विद्यार्थ्यांनी आखाडा वॉर्ड, बमेश्वर चौक, तहसिल चौक ,मेनलाईन व बिरसामुडा चौक या मार्गाने विध्यार्थाची रॅली काढण्यात आली व मुख्य चौकात पथनाटय करण्यात आले .रॅलीमध्ये गुरुकुल शाळेतील २५० विध्यार्थानी सहभाग घेतला.या पथनाट्यामध्ये वेगाने वाहन चालविणे, मद्य प्राशन करून वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, चुकीच्या बाजूने वाहन चालविणे, दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान न केल्याने काय दुष्परिणाम होतात या बाबत संदेश दिला. पथनाट्य सादरीकरणासाठी शहर वाहतूक शाखेचे API गजानन करेवाड यांनी पुढाकार घेतला.
पाढरकवडा पोलीस स्टेशन येथे उपविभागीय पोलीस अधीकारी रामेश्वर बेजने ,P.I दिनेश झावरे, पाढरकवडा वाहतुक शाखा API गजानन करेवाड, वाहतुक पोलीस शामसुंदर निवेकर,हरीदास मानकर,अशोक पत्रे,निवत्ती कुळसंगे,गजानन नव्हाते,अशोक जाधव तसेच नॅशनल हायवे अधीकारी कांतीकुमार, अन्केश श्रीवास्तव, निखील पन्डा, कोन्डलराव यांचेकडून गरजूंना दुचाकी चालक व्यक्तीना हेल्मेटचे वाटपही करण्यात आले आहे.
“सन २०२३ मध्ये जिल्हा वाहतुक नियंत्रन उपशाखा पांढरकवडा यांचे कडुन १२२०८ मोटार वाहान कायदया अन्वये केसेस करुन ५६ लाख ७१हजार ३०० रू/- दंड वसुल करण्यात आला.या पुढे वाहतुक नियम न पाळणाऱ्या व्यक्तींवर दडात्मक कारवाई करण्यात येईल, तसेच जिल्हा वाहतुक नियंत्रन उपशाखा पांढरकवडा वतीने सर्व नागरीकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पालन करण्याबाबत आव्हान करण्यात आले.”