•स्तुत्यमय उपक्रमाची शहरात चर्चा.
अजय कंडेवार,वणी:- यवतमाळ काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इजहारभाई शेख यांचा उद्या (ता.29) वाढदिवस. आज पूर्वसंध्येला त्यांचा वाढदिवस मित्र परिवाराने सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. अभिजित सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली इजहार शेख मित्रपरिवारातर्फे पावसाचा सरी सुरू असतानाही आजूबाजूच्या खेड्यातील शेत पोडावर जाऊन पाचशेहून अधिक शेतकरी बांधवांना छत्रीचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी राजू डफ,निलेश लांडे ,अभिजीत सोनटक्के,आरिफ रहमान,चंदन शर्मा,निलेश जहगीरदार, शशांक कुलडिवार, नरेश पाते,मुकेश सर हे उपस्थित होते.