•खेकडवाई शेतशिवारातील घटना
•शेतकरी शेतमजूरात दहशत
नागेश रायपुरे, मारेगाव:- दावणीला बांधून असलेल्या गोऱ्यावर वाघाने हल्ला चढवीत एकाचा फडशा पाडत तर दुसऱ्या गोऱ्याला गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना मारेगाव वनपरिक्षेत्रात गोंडबुरांडा बिट जंगल परिसरातील खेकडवाई शेतशिवारात घडली.ऐन कापूस वेचणीच्या हंगामात या घटनेमुळे परिसरातील शेतकरी शेतमजूरात चांगलीच दहशत पसरली आहे.
गोंडबुरांडा बिट जंगल परिसरात खेकडवाई शेत शिवारात किसन चंदू आत्राम रा.खेकडवाई या शेतकऱ्यांचे नेहमी प्रमाणे दावणीला गोऱ्या बांधून होते.दरम्यान त्या गोऱ्यावर वाघाने अचानक झडप घालून त्याला ठार केले. तर दादाजी रामपुरे रा.खेकडवाई याच्या गोऱ्यावर हल्ला करीत असताना किसन चंदू आत्रम याच्या पत्नीला दिसला असता आरडाओरडा करून त्या वाघाला पळवले. परंतू गोरा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती येथील पोलिस पाटलानी वन विभागाला कवळताच मारेगाव वनविभागाची टीम घटनास्थळी पोहचली. व सदर घटनेचा पंचनामा करत वाघाच्या खुणा पाहून तो वाघच असल्याचे निष्पन्न केले.
ऐन कापुस वेचणीच्या हंगामात वाघाने हल्ला चढविल्याने परिसरातील शेतकरी शेतमजूरात चांगलीच दहशत पसरली आहे. वाघाचा बंदोबस्त तत्काळ करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी शेतमजूर वर्गाकडुन होत आहे.आता यावर मारेगाव वनविभाग काय भूमिका घेणार यावर परिसरातील जनतेचे लक्ष वेधले आहे.