•लाईमस्टोनचा आवारात पार पडला कार्यक्रम.
अजय कंडेवार,वणी :- वांजरी लाईमस्टोन माइन्स कंपनी तर्फे खाण सुरक्षा सप्ताहाचे आयोजन ता.८ जाने,सोमवार रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख डायरेक्टर म्हणुन डी.जी.एम्.एस (नागपूर) महतो, अंबुज सिमेंट-संजय उपरे ,माणिकगड सिमेंट-राजेश मेश्राम,लॉयड मिनरल-अमित जुनघरी व वांजरी लाईम स्टोनचे मालक अविनाश वारवतकर,वांजरी लाईम स्टोन माईनचे खाण प्रबंधक विंचूरकर, इंजी.गुलाब गेडाम, फोरमन सिन्हा, ब्लास्टर गजानन किन्हेंकर तसेच वांजरी लाइमस्टोनचे कर्मचारी वेंकटराव अंधेवार ,समय्या कोंकटवार, सुनिल कोहळे इतर खाण कर्मचारी उपस्थित होते.Mining Week by Wanjari Limestone Mines.
DGMS नागपूर महतो यांनी माईनस सेप्टी विषयी अनमोल मार्गदर्शन करतांना येणाऱ्या बदलत्या काळाच्या आव्हानांना एका पिढीने दुसऱ्या पिढिला जागृत करणे,खाणीमध्ये काम करतांना सुरक्षा नियमाचे पालन करने तसेच सुरक्षा अधिकाऱ्यांनी सुरक्षा बाबत अमूल्य असे मार्गदर्शन करीत उपस्थितांना सुरक्षा ही नेमकी कशा पद्धतीने केली जाते तसेच खान मध्ये होणारे विविध अपघात यातून आपण सुरक्षित राहून कसे सुरक्षित राहावे याबद्दल बहुमूल्य मत व्यक्त केले.या खाण सप्ताहात डायरेक्टर डि. जी. एम. एस. (नागपूर) महतो, अंबुज सिमेंट-संजय उपरे ,माणिकगड सिमेंट-राजेश मेश्राम- लॉयड मिनरल-अमित जुनघरी यांनी लाइमस्टोन खाणकामाची पाहणी केली.
यावेळी DGMS नियमांनुसार कार्यरत असल्याचे आढळले. या कार्यक्रमाचे संचालन वांजरी लाईम स्टोनचे मॅनेजर विंचूरकर याने केले तर आभार प्रदर्शन गुलाब गेडाम यांनी केले.या कार्यक्रमाचा यशस्वितेसाठी खाण वांजरी लाईमस्टोनचे समस्त कर्मचाऱ्यांनी परिश्रम केले.