Tuesday, February 17, 2026
HomeBreaking Newsवर्धा नदीघाटातील रेतीतस्करीत चोरट्यांनी "विवेक बुध्दी"वापरली का?

वर्धा नदीघाटातील रेतीतस्करीत चोरट्यांनी “विवेक बुध्दी”वापरली का?

•झोला प्रकरणात मशीन मालकावर अद्यापही गुन्हा दाखल नाही. •गाड्या पकडा ,मालक मस्त फ्री, पाणी मुरत कूठे आहे.?

Ajay Kandewar,Wani:- येथील तहसील मुख्यालयापासून अवघ्या काही किमी अंतरावर असलेल्या झोला गावालागतच्या वर्धा नदी घाटातील अवैध खड्डे खोदून रेती तस्कर बिनदिक्कतपणे रेतीचा उपसा केला. नदी पात्रात मोठमोठे खड्डे खोदून रेतीची रात्रभर उचल केली. यावरून रेती तस्करांचा हा गोरखधंदा उथळ मानेने सुरू आहे हे स्पष्ट झाले. विशेषतः कारवाया ही तहसिलदार जोमात करित आहे “तेही फक्त गाड्या लावा मालक सोडा” अश्याच भावनेनं कार्रवाई होत असावी असा अंदाज आह.रेती चोरट्याची मशीन पकडली पण गून्हा अद्यापही दाखल करण्यात आला नाही तरी सुध्दा महसूल प्रशासनाला हा प्रकार दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे

वणी तालुक्यांत काहीं खादाडाना ‘मॅनेज‘ केले असल्याने रेती उपस्याची खुली मुभा आहे अशी जोरदार चर्चा आहे. आता तस्करच प्रशासनाला खुले ‘चॅलेंज’ देत असल्याने कर्मचारी कारवाई करण्याची हिंमत दाखवणार का असा प्रश्न विचारला जात आहे.तालुक्यात तस्करांनी धुमाकूळ घातल्याने बहुतेक नाले रेतीविना कोरडे पडले आहे. त्यामुळे आता रेती तस्करांनी वर्धा नदीला ‘टार्गेट’ केले आहे. यात महसुल प्रशासन मूंग गिळून का आहे. फक्तं गाडी लगाओ….. माल जप्त करो शासन को कार्रवाई दिखाओ और आरोपी भगाओ अशी सध्याची परिस्थिती दिसत आहेः.

मशीन मालकावर अद्यापही गुन्हा दाखल करण्यास प्रशासन लपवलपवी का करताहेत….

वणी तहसिल प्रशासनाने झोला घाटात धाड घातली असता,पोकलेन मशीन व एक हायवा जप्त केला हजारों ब्रास रेती चोरीला गेली.जबाबदार कोण फक्त गाडी आणि मशिन जप्त केल्याने शासनाला फायदा झाला आहे का ?यातच धन्यता मानत आहे.पण ही मशीन कुणाची ?मालक कोण.मग यावर रेती चोरीचा गुन्हा का दाखल अद्यापही केला नाही. यावर दंड का आकारला नाही.यात प्रशासनाचे पाणी नेमक मुरत कूठे आहे. यात त्या  “एका खादाडाने ” एंट्री मारली का? आणि यात त्यानें आपलीं “विवेक बुद्धी” वापरली असावी असाही संशय येऊ लागला आहे. अशी खमंग चर्चा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments