अजय कंडेवार,वणी :- सध्या वातावरणातील बदलामुळे डोळे येण्याची (कंजंक्टिव्हायटिस) साथ सुरू झाली आहे. जवळपास शंभरहून अधिक शाळकरी मुलांना या साथीला सामोरे जावे लागले आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असून वातावरणात बराच बदल झाला आहे. त्यामुळे डोळे येण्याची साथ वाढत आहे. हा आजार साथीच्या स्वरूपात असल्याने विद्यार्थ्यांनी एकत्र न येता अधिक काळजी घेण्याची गरज आहे. Beware..Eye disease has come in Wani city.
या साथीत नेमके विद्यार्थीच जादा बाधित होत आहेत. याचबरोबर शाळेत गेल्यावरही एकमेकाशी संपर्क आल्याने डोळे येण्याचे प्रमाण वाढले. डोळे आल्याची लक्षणे आढळून आल्यास वेळीच नेत्रचिकित्सकांकडून डोळ्याची तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे स्थानिक ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक सुलभेवार सांगितले.साथीचा प्रसार कसा होतो?- या साथीचे संक्रमण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे- डोळे आलेल्या व्यक्तीचा रुमाल, चष्मा, सौंदर्यप्रसाधने याचा वापर केल्याने आजाराची लक्षणे – डोळ्यांची जळजळ होणे- डोळे दुखणे- डोळ्यातून सतत पाणी येणे- पापण्या चिकटणे- डोळ्यांना प्रकाश सहन न होणेडोळे आल्यास काय करावे?- डोळ्यांची स्वच्छता राखावी – डोळ्यांना हात लावल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत- डोळे आलेल्या व्यक्तीने घराबाहेर पडताना चष्मा वापरावा- आपला रुमाल, चष्मा, आयड्रॉप्स अथवा वस्तू इतरांना वापरण्यास देऊ नये – डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळीच उपचार घ्यावेतलहान मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे.
वणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. धर्मेंद्र सुलभेवार यांनी याबाबत सांगितले की, डोळ्यांच्या साथीचे रुग्ण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. मात्र, शालेय वयातील मुलांमध्ये डोळे येण्याचे प्रमाण अधिक असल्याने अशा मुलांनी इतरांपासून दूर राहणे गरजेचे आहे.