Friday, October 23, 2026
HomeBreaking Newsवणी विधानसभेत पवार गटाची " तुतारी "वाजू लागली.....

वणी विधानसभेत पवार गटाची ” तुतारी “वाजू लागली…..

•दिलीप भोयरच्या नेतृत्वाखाली गावोगावचा जनओघ.

Ajay Kandewar,Wani:- गावागावातून वाढणारा जनसमर्थनाचा ओघ आता थेट शरद पवार गटाच्या तुतारीकडे वळताना दिसत आहे. विशेष म्हणजे, दिलीप भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवाह अधिक वेगाने वाढू लागला आहे.

खेड्यातील युवक, मेहनती शेतकरी आणि महिलांचा लोंढा दिवसेंदिवस या तुतारीकडे आकर्षित होत असल्याचे स्पष्ट जाणवते. गावपातळीवर चालणाऱ्या चर्चा आणि सभांमध्ये “बदल हवा” हा सूर जास्त ठळक होत असून, सत्ताधाऱ्यांच्या गोटात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, हा ओघ केवळ प्रचारापुरता नाही तर स्थानिक निवडणुकांमध्ये तुतारी जोरात वाजण्याची चिन्हे आता स्पष्ट दिसू लागली आहेत. ग्रामीण भागातून मिळणारा हा प्रतिसाद जर असाच टिकून राहिला, तर आगामी निवडणुकीत पवार गटासाठी मोठा फायदा ठरू शकतो.

ही तुतारी केवळ निवडणुकीचा प्रारंभ नव्हे तर ग्रामपातळीवरील असंतोषाचे सशक्त प्रतीक आहे. युवकांची ऊर्जा, शेतकऱ्यांचा विश्वास आणि महिलांचा सहभाग हे समीकरण जर पवार गटाने घट्ट पकडले, तर वणी विधानसभा रणांगणात राजकीय नकाशा बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page