•परेड संचलनात प्रथम तर झाकी सांस्कृतिक कार्यक्रमात तृतिय क्रमांक
अजय कंडेवार वणी :- प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय मैदान वणी येथे 26 जानेवारी 2024 रोजी चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी च्या विद्यार्थ्याचा एन.सी. सी. पथकाचा परेड संचालनात प्रथम क्रमांक प्राप्त केला. एन .सी .सी पथकाचे प्रमुख एन.सी. सी. 1st Rank Officer नरेश बेलेकर व CHM प्रभात पठाडे यांनी उत्कृष्ट संचालांचे सादरीकरण केले.तसेच झाकी सांस्कृतिक कार्यक्रमात तृतिय क्रमांक पटकाविला. या सांस्कृतिक कार्यक्रमात “कथा रामायण की” या विषयावर विद्यार्थांनी सादरीकरण केले.
या सादरीकरणात 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला . प्रमोद पोडे,गजेन्द्र काकडे,चंद्रशेखर मत्ते ,सोनल सरमोकदम,अश्विनी जिवतोडे,जयप्रकाश गोरे,संगीता देरकर,अल्का बोढाले, अनिता उपरे ,सुनीता सोनकुसरे,मनोज खिरटकर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर च्या अध्यक्षा प्रतिभाताई जीवतोडे व सचिव प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले .तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एम.डी.जोगी उपमुख्याध्यापक डी.एस.बोबडे पर्यवेक्षक व्ही.एस.आसुटकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले .