•पालकांचा विशेष बैठकीत घेण्यात आला “हा ” निर्णय.
अजय कंडेवार,वणी :- शहरातील नामांकित मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी सीबीएसई शाळा वणी येथे आता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या NEET आणि JEE च्या तयारीसाठी फाउंडेशन बॅच सुरू करण्यात संदर्भात पालकांची विशेष बैठक (दिं.29 मार्च, बुधवारला ) घेण्यात आली.Foundation course for JEE and NEET preparation started at Wani Macaroon School .
संस्थेचे उपसंचालक पियूष आंबटकर म्हणाले की, अनेक विद्यार्थी आणि पालक निर्णय घेण्यास विलंब करतात.त्याकरिता ही बैठक आयोजित केली आहे.कारण विद्यार्थ्यांना NEET आणि JEE मध्ये यश मिळवण्यात अडचणी येतात. अशा परिस्थितीत मॅकरून शाळेने पालकांचा संमतीने पाचवी ते दहावीपर्यंत NEET आणि JEE ची तयारी करण्याचा निर्णय घेतला आहे.ज्या मुलांचे सुरुवातीचे शिक्षण चांगले होते, त्यांचा निकालही भविष्यात चांगला लागतो.ते म्हणाले की, येथे राष्ट्रीय स्तरावरील शिक्षकांकडून तसेच अनुभवी प्राध्यापकवर्ग( Best teaching Faculty) विद्यार्थ्यांना चांगल्या वातावरणात तयार केले जाते. ज्याचा सकारात्मक परिणामही दिसून येत आहे.संकल्पनांवर भर देऊन विद्यार्थ्यांना चांगले निकाल देण्यासाठी ही महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था कटिबद्ध असल्याचे उपसंचालकांनी सांगितले. लवकरात लवकर मुलाची नोंदणी(Enrollment) करून येणाऱ्या भविष्याची तयारीकरीता JEE आणि NEET यश मिळवावे, असे आवाहन त्यांनी विद्यार्थी आणि पालकांना केले आहे.
यावेळी संस्थेचे उपसंचालक पियूष आंबटकर, श्रीमती शोभना(मुख्यद्यापिका) व कन्हैया तिवारी व मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होते.