•सतत 2 तास पथसंचलन आणि खाकीचा दिसला दम...
अजय कंडेवार,वणी:- . रामनवमी, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, आगामी रमजान पर्व या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.29 मार्च) ला सायंकाळीं 6 वाजता DYSP संजय पुज्जलवार यांच्या आदेशाने वणी पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्या नेतृत्वाखाली वणी पोलिसांनी संपुर्ण शहरात शस्त्रासह सतत 2 तास”रुट मार्च” काढत वणीकरांना खाकीचा दम दिसला.Wani police route march, appeal to maintain peace..
तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने वणी शहरात दंगल नियंत्रण पथकासह सशस्त्र रुट मार्च करण्यात आला. आगामी सणानिमित्त पंचक्रोशीत कोठेही अनुचित प्रकार घडू नये, सण, उत्सव शासनाच्या नियमानुसार शांततेत साजरे व्हावे आणि समाजकंटकांवर वचक निर्माण व्हावा या उद्देशाने तालुका पोलिसांनी सशस्त्र संचलन करत शक्तीप्रदर्शन केले.Vani police route march, appeal to maintain peace..
हा रूट मार्च शहरातील टिळक चौक-शहीद भगतसींग चौक -खाती चौक-सर्वोदय चौक-टागोर चौक-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक- गांधी चौक -साई मंदिर चौक या मार्गाने काढण्यात आला.