•सतत 2 तास पथसंचलन….
अजय कंडेवार,वणी:- गणेशोत्सव व ईद- द- मिलाद या सणासुदीचा पार्श्वभूमीवर दि.19 सप्टें. मंगळवार रोजी DYSP गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलिस स्टेशनचे ठाणेदार P.I अजित जाधव यांच्या नेतृत्वात वणी पोलिसांनी संपुर्ण शहरात “रुट मार्च” काढला.
तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने वणी शहरात दंगल नियंत्रण पथकासह सशस्त्र रुट मार्च करण्यात आला. आगामी सणानिमित्त पंचक्रोशीत कोठेही अनुचित प्रकार घडू नये, सण, उत्सव शासनाच्या नियमानुसार शांततेत साजरे व्हावे आणि समाजकंटकांवर वचक निर्माण व्हावा या उद्देशाने तालुका पोलिसांनी सशस्त्र संचलन करत शक्तीप्रदर्शन केले.
हा रूट मार्च शहरातील टिळक चौक-शहीद भगतसींग- म चौक -मोमिनपुरा- खाती चौक -सर्वोदय चौक-टागोर चौक-डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक- गांधी चौक -साई मंदिर चौक – मार्गाने काढण्यात आला. यावेळी Dysp गणेश किंद्रे मार्गदर्शनात,PI अजित जाधव,API माधव शिंदे,माया चाटसे, दत्ता पेंडकर, राजेश पुरी व PSI सुदाम आसोरे व समस्त वणी पोलिस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते.