Tuesday, February 17, 2026
HomeUncategorizedवणी नगराध्यक्षावरुन "संजीवरेड्डी बोदकुरवार व संजय देरकर" यांची "इज्जत दाव पे..."

वणी नगराध्यक्षावरुन “संजीवरेड्डी बोदकुरवार व संजय देरकर” यांची “इज्जत दाव पे…”

•निकालाकडे संपूर्ण शहराचे डोळे.

Ajay Kandewar, Wani : वणी नगरपरिषद निवडणुकीत मतदान झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष एका निर्णायक लढतीकडे खिळले आहे.माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि विद्यमान आमदार संजय देरकर यांची प्रतिष्ठा थेट पणाला लागलेल्या या महाबाजारातील निकालाकडे लागले.

नगराध्यक्षपदासाठी दोन्ही नेत्यांनी आपापल्या ताकदीने उमेदवार उभे केले असून रेड्डी यांच्या पक्षातून विद्या खेमराज आत्राम तर देरकर यांच्या गटातून डॉ. संचिता नगराळे (गेडाम) या सरळ आमने-सामने उभ्या आहेत. मतदान प्रक्रिया पार पडताच दोन्ही गटांमध्ये परिणामाबाबत चिंतेची, उत्सुकतेची आणि तणावाची हवा जाणवू लागली आहे.मतदानाच्या दिवशी प्रभागनिहाय झालेल्या हालचाली, कार्यकर्त्यांची धावपळ,मतदारांना मतदान केंद्रांकडे वळवण्यासाठी केलेला जबरदस्त प्रयत्न यामुळे ही निवडणूक वणीच्या इतिहासातील सर्वाधिक प्रतिष्ठेची ठरल्याचे आहे.

संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यासाठी ही निवडणूक पत, प्रतिष्ठा आणि आपले जुने वर्चस्व कायम ठेवण्याची कसोटी आहे. तर संजय देरकर यांनी प्रथमच नगराध्यक्ष पदासाठी स्वतःचा उमेदवार रिंगणात उतरवून या निवडणुकीला आपल्या नेतृत्वाची ताकद दाखवण्याचे रणांगण बनवले आहे. त्यामुळे या दोन नेत्यांपैकी कोणाची बाजू मतदारांनी स्वीकारली याचा निकाल त्यांच्या राजकीय भविष्यासाठीही महत्वाचा ठरणार आहे.मतदारांनी शांतपणे मतदान केले असले तरी दोन्ही गटांनी बूथवर पाहिलेली गर्दी, महिलांचा व युवकांचा मिळालेला अपेक्षित किंवा अनपेक्षित प्रतिसाद, काही प्रभागांतील अचानक झालेले मतदानाचे बदलते ट्रेंड—या सगळ्यामुळे निकाल अधिकच अनिश्चित व रोमहर्षक बनला आहे.

शिंदे गटाची “स्ट्राईक रेट”परफॉर्मन्स…..?

वणीचा राजकारणात भाजप आणि उबाठा यांची थेट प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना, विजय चोरडिया यांचा नेतृत्वात शिंदे गट मात्र आपली वेगळीच रणनीती राबवत आहे. पहिल्यांदाच नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसाठी उमेदवार उभे करूनही ते कोणत्याही प्रतिष्ठेच्या ओझ्याखाली नाहीत. त्यांच्यासाठी संपूर्ण निवडणूक एकाच सूत्रावर आधारलेली आहे ते म्हणजे फक्त “स्ट्राईक रेट किती जोरदार?”जिंकणारे किती, पराभूत किती हे गणित शिंदे गटात नेहमीसारखे कॅल्क्युलेटरवर मोजले जात नाही; तर फक्त टेस्ट, ग्राऊंड फीडबॅक आणि प्रभागनिहाय ‘विनिंग पॉसिबिलिटी’ यावर हा खेळ अवलंबून आहे. ज्या पक्षांसाठी “प्रतिष्ठा वाचवणे” ही लढत आहे, त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटासाठी ही निवडणूक परफॉर्मन्स मोजण्याची पहिली परीक्षा ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments