•नागरिकांच्या आरोग्याशी खेळ,जलशुद्धीकरण केंद्र केवळ देखावा.
•जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकारी यांचेवर योग्य ती कारवाई करावी या मागणीला जोर…
अजय कंडेवार, वणी:- नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून शहरात होणारा पाणी पुरवठा अशुद्ध स्वरूपात होत असल्याचे आरोप नागरीक करीत आहे. पालिकेकडून चालविले जाणारे जलशुद्धीकरण केंद्र केवळ देखावा बनले आहे. या केंद्राद्वारे पाण्याचे शुद्धीकरण केलेच जात नाही व पाणीपुरवठा नियमितही होत नाही आहे तसेच नदीतून ओढलेले अशुद्ध पाणी नळाद्वारे नागरिकांच्या घरी पोहोचत आहे. विशेष अश्यातच नागरिकांकडून पाणीकर वसुली तर जोरदार केली जात असल्याने नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाप्रती चिड व्यक्त होत आहे व वणी नगरपालिकेने नागरिकांच्या आरोग्याशी खेळच मांडला आहे, असा आरोप समस्त नागरिकांनी दि. 9. मार्च रोजी गुरूवारला वणी नगरपालिकेचा मुख्याधिकारीमार्फत निवेदन देत यवतमाळ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना साकडे घातले आहे.(Supply of impure water from Wani Municipality)
निर्गुडा नदी व वर्धा नदीवर स्वतंत्र पाणी पुरवठा योजना व संपूर्ण शहरांत 22 बोरवेल जिवंत असतांना वणीकर जनतेला तीन दिवसाआड पाणी पुरवठा म्हणजे वर्षातून केवळ 4 महिनेच पाणी पुरवठा केला जात आहे. जनतेकडून मात्र वार्षिक टॅक्स वसुल केले जात आहे. पाण्याच्या अनेक टाकी दरमहा साफ केल्या जात नाही. कोणत्याही पाण्याच्या टाकीवर सुरक्षा रक्षक नाही. ही बाब वणीकर जनतेच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. मात्र मुख्याधिकारी सुस्त दिसत आहे आणि कोणतेही अँक्शन घेतांना दिसून येत नाही. म्हणून काही लागेबाधे तर नाही असा स्पष्ट आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. या सर्व बाबीची चौकशी करून जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या मुख्याधिकारी यांचेवर योग्य ती कारवाई करावी करण्याची जिल्हाधिकारी यांचेकडे जनतेनी विशेष मागणी केली आहे तसेच नियमित व शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. ( Supply of impure water from Wani Municipality)
शहरातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या दैनंदिन उपयोगाएवढे पाणी पुरविणे हे नगरपरिषदेचे कर्तव्य आहे. पुरविलेले पाणी नागरिकांच्या आरोग्याला अपायकारक नसावे, हेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी पालिका नागरिकांकडून पाणी कराच्या स्वरूपात कर घेते. पालिका प्रशासनाने पाणी कर वाढवले आहे. मात्र महिन्यातून काही दिवस किंवा वर्षातून 3 महिनेच पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे नगरपालिकेचे फावले जात आहे. मात्र काही भागात नागरिकांच्या बोअरला क्षारयुक्त पाणी येत असल्याने त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी नळाच्या पाण्यावरच विसंबून राहावे लागत आहे.. पालिकेने पाण्याचे शुद्धीकरण करून पाण्याचा पुरवठा करणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून नळाला येणाऱ्या पाण्याला दुर्गंधीही येत असल्याचे नागरिक सांगत आहे. या संदर्भातील निवेदनाचा प्रती वणी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.
यावेळी राजू तुरानकर, मंगल भोंगळे, सुदाम गावंडे, महेश पहापड, शुभांगी सपाट, ज्योती कापसे, गीता तुरानकर, कुंदा नांदे, साधना तुरानकर, जोस्ना सुरपाम, तुळसा नगराळे, विद्या वानखेडे, सिमा खोब्रागडे व असंख्य महिलाही उपस्थित होते.