VidarhbhNews,Wani– आगामी नगरपरिषद निवडणुकीत उबाठा गटाकडे शहराचा कल झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. शहरातील राजकीय समीकरणांमध्ये जोरदार बदल जाणवत असून मतदारांचे आकर्षण मोठ्या प्रमाणात उबाठाच्या दिशेने सरकत असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वात उबाठा पथक निवडणुकीसाठी भक्कम तयारीसह मैदानात उतरले आहे. संघटनात्मक बळ, प्रभागनिहाय सक्रिय रणनीती आणि स्थानिक प्रश्नांची अचूक समज अशा तिहेरी मजबूत पायावर हा गट पुढे सरकत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.शहरातील अनेक प्रभागांमध्ये उबाठा समर्थकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसत असून, प्रचारसभांमध्ये मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा ‘विजयाची चाहूल’ मानला जात आहे. त्यामुळेच नगराध्यक्षपद तसेच नगरपरिषदेतील अनेक जागांवर उबाठा गट ‘वन साइड’ विजय मिळवेल अशी शहरात जोरदार चर्चा आहे.उबाठा नेतृत्वाची जमलेली पकड, कार्यकर्त्यांचा उमेदीने केलेला सहभाग आणि मतदारांचा वाढता कल लक्षात घेता, या निवडणुकीत उबाठा गट भक्कम यशाकडे वाटचाल करत असल्याचे चित्र अधिक स्पष्ट होत आहे.

