• या उपक्रमामुळे नागरीकांनी समाधान व्यक्त केले
अजय कंडेवार, वणी :- नगर परिषद वणी (जि. यवतमाळ) यांचे विद्यमाने शहराती दिव्यांग #Wani Municipal Council distributed more than 19 lakh grants to 250 disabled people@ नागरीकांकरीता सेवा सुविधा विशेष योजना राबविण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील नागरीकांच्या सर्व स्तरातील घटकांचा करीता सेवा – सुविधा देणा-या अनेक लाभदायक योजनाची अमलबजावणी करणेबाबत निर्देश नगर पालिकांना दिलेली आहे. त्याच शुंखलेतील वणी शहरातील दिव्यांगाकरीता लाभदायक योजना राबविण्यात आली आहे.त्यात वणी नगर परीषदेने 250 दिव्यागांना 19 लाखापेक्षा अधिक अनुदान वाटप केले.
शहरातील सर्व दिव्यागाची नोंदणी करण्याचा विशेष कार्यक्रम राबविण्यात आला आहे. या कार्यक्रमात शहरातील 250 दिव्यागांची नोंदणी करण्यात आली आहे. या विशेष मोहिमेत अंतर्गत वणी शहरातील 30 दिव्यागांना जिल्हा वैद्यकीय अधिक्षक, सामान्य रुगणालय यवतमाळ यांचे कार्यालयात नेऊन ऑनलाईन स्वरुपाचे – दिव्यांग प्रमाणपत्र काढून देण्यास सहकार्य करण्यात आले. त्याबाबतचा संपूर्ण प्रवास खर्च व इतर खर्च नगर परिषद मार्फत करण्यात आला आहे. शासनाचा निर्देशानुसार 80 % ते 100%व 60%ते 80 %40% ते 60% या प्राधान्य क्रमाने अनुदान वितरीत करण्याची मार्गदर्शक तत्वे निश्चीत केली आहे. त्यानुसार वणी नगर परीषदेने शहरातील 250 दिव्यागांना 19 लाख 63 हजार अनुदान वाटप करण्यात आले.या उपक्रमामुळे नागरीकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

या योजनेचा अमलबजावणी करीता धम्मरत्न पाटील (लिपीक, न.प. वणी) यांनी विशेष परीश्रम घेतले असून अभिजित वायकोस (मुख्याधिकारी, नगर परिषद वणी) निखील धुळधर(प्रशासक, नगर परिषद वणी) यांचे मार्गदर्शन लागले. योजना यशस्वी राबविण्याबदल सर्व नागरीकांचे विशेषतः दिव्यागांचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे आभार जयंत सोनटक्के (उपमुख्याधिकारी, नगर परिषद वणी) यांनी मानले.

