•त्रुटींची पूर्तता करून परिवहन मंडळाचे दुर्लक्ष
• शासनानेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीकडे लक्ष द्यावे
सुरेन्द्र ईखारे,वणी– वणी ते शिरपूर,शिंदोला मार्गे माथोली कैलासनगर बससेवा सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद माजी सदस्य विजय पिदूरकर यांनी व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ वणी याना देण्यात आले आहे.
यवतमाळ परिवहन विभागाचेवतीने वणी ते शिरपूर, शिंदोला मार्गे माथोली, कैलासनगर रस्त्याची पाहणी करून रस्त्यामध्ये असणाऱ्या त्रुटींची पूर्तता करण्यात आली असून सुद्धा बससेवा सुरू करण्यात आली नाही . वणी हे शालेय शिक्षणाचे केंद्र बिंदू असल्याने बाहेर गावावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या बस सेवेची आवश्यकता आहे. पहिल्या वर्गापासून तर उच्च शिक्षणापर्यंत चे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी वणी येथे खासगी प्रवासी वाहनाने प्रवास करीत आहे.
खासगी प्रवास वाहतुकीचे तिकीट भाडे हे मनमानी असल्याने विद्यार्थ्यांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजुरांचे पोर हे विद्यार्थी असल्याने कधी पैसे अभावी शाळेला दांडी मारत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होताना दिसून येत आहे . शासनाने शालेय विद्यार्थी यांचे करिता सवलतीच्या दरात व मोफत प्रवास उपलब्ध करून बस सेवेचा लाभ योजना आहे. परंतु वणी ते शिरपूर, शिंदोला मार्गे माथोली कैलास नगर बस फेरी सुरू होण्यास बराच उशीर झालेला आहे.
तेव्हा शासनाने शिंदोला ,कुर्ली, आबइ, खांदला, येनक, मुंगोली, शेवाळ , कोलगाव, साखरा, शिवणी, जुगाद, चनाखा, हनुमानगर ,माथोली ,कैलासनगर तथा चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर गाडेगाव अशा 16 गावातील विद्यार्थी नागरिकांना बससेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी नागरिकांनी केली आहेत संबंधित निवेदनाच्या प्रतिलिपी विभागीय नियंत्रक प म यवतमाळ, हेमंत नानाही इचोडकर, याना देण्यात आले आहे. तेव्हा शासनाने त्वरित कार्यवाही करून शालेय विद्यार्थ्यांना बससेवा सुरू करून सहकार्य करावे असे अशी मागणी जिल्हा परिषद माजी सदस्य यांनी केली आहे.