नागरिकांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याना सहकार्य करण्याचे आवाहन
सुरेंद्र इखारे,वणी– केंद्र शासन अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत कृष्ठरोग व क्षयरोग मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने वणी येथील तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयात समन्वय समितीची सभा घेण्यात आली.
या सभेचे अध्यक्षस्थानी वणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार हे होते . प्रमुख मार्गदर्शक डॉ अमित शेंडे , पी एस चोरमले, सी आर वालदे, मारोती पुनवटकर , नीता बदकुले , फार्मासिस्ट मनोज खाडे उपस्थित होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक तालुका आरोग्य अधिकारी डॉ अमित शेंडे यांनी वणी तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आशा व स्वयंसेवक कर्मचार्यांना मार्गदर्शन केले .
गावात दवंडी ,प्रभातफेरी काढून जनजागृती करणे, संशयित रुग्णांचा शोध घेऊन औशोधोपचार करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. घरोघरी येणाऱ्या आरोग्य कर्मचार्यांना कृष्ठरोग या संदर्भातील माहिती देणे जसे त्वचेवर फिकट, लालसर, व खाजनारा बधिर चट्टा, तेलकट चकाकणारी त्वचा, गाठी, कानाच्या पाड्या जाड होणे, भुव्यांचे केस विरळ होणे, तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे अशी लक्षणे दिसल्यास आरोग्य विभागाशी संपर्क करणे तसेच दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला ,रात्री ताप येणे, वजनात घट होणे, भूक मंदावणे, ही क्षयरोगाची लक्षणे आहेत परंतु हा आजार बरा होणारा आहे. तेव्हा सर्वेक्षणासाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करून औशोधोपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.