Ajay Kandewar,Wani:- तालुक्यातील वणी पोलिस ठाण्यामध्ये बेवारस, गुन्ह्यातील तसेच अपघातातील दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने मुळ मालकास परत करण्यासाठी पोलिस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आलेली आहेत. ही वाहने पडताळणी करुन मुळ मालकाचा शोध घेऊनही ते न सापडल्याने किंवा विविध कारणास्तव परत न देता आल्याने बेवारस अवस्थेत अनेक वर्षे पडून आहेत. अशा वाहनांचा प्रत्यक्ष लिलाव 16 फेब्रुवारी रोजी केला जाणार आहे.
तत्पूर्वी या बेवारस वाहनांबाबत आजपर्यंत कोणत्याही मालकाने दावा केलेला नाही. तसेच यांच्याकडे उपलब्ध वाहनांचे चेसीस, इंजीन, आरटीओ रजिस्ट्रेशन करुन पडताळणी केली असता या बेवारस वाहनांचे कोणतेही रेकॉर्ड सापडले नाही.यामध्ये 03 बेवारस दुचाकी वाहन 1) TVS व्हिक्टर मोसा क्रमांक MH34-P-3191, 2) हिरो होन्डा स्प्लेन्डर बिना नंबरची,3) होन्डा फॅशन प्लस मोसा क्रमांक MH34-Y-3483 व काहीं प्रकरणातील एकुण 400 किलो बेवारस लोखंडी भंगार पोलीस स्टेशन वणीचे आवारात जमा आहे. त्यामुळं या होणाऱ्या लिलावाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
•वाहने घेऊन जाण्याचे आवाहन….
“पोलिस ठाण्यात ठेवण्यात आलेली वाहन कोणाचे असल्यास, चोरीस गेलेली असल्यास अगर अपघातग्रस्त होवुन नादुरुस्त झाले असल्यास व ती वाहने घेवून जावी. याबाबत वणी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उंबरकर यांचेशी संपर्क साधावा. वाहनाची कागदपत्रे दाखवून खात्री करुन ती घेवुन जावीत, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.-