• आता या हेविवेट ठाण्यात कोणाची नजर ?
अजय कंडेवार,वणी :- महाराष्ट्र पोलीस कायदा मधील कलम २२ न (१) व (२) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करुन परिक्षेत्रीय पोलीस आस्थापन मंडळाने जिल्हयातील विहीत कालावधी पूर्ण झालेल्या पोलीस निरिक्षकांची बदली करण्यात आली आहे.बदल्यांची यादी अखेर विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी बुधवारी रात्री अंतिम मोहर लावून जाहीर केली. त्या आदेशात P.I प्रदिप शिरस्कर यांची बदली (वणी) यवतमाळ येथून अकोला इथे करण्यात आली आहे.
या आधी महल्ले हे ठाणेदार म्हणून वणीत रूजू झाले होते.त्यांच्याकडून कायदा व सुव्यवस्था बाबतीत मोठ्या अपेक्षा होत्या मात्र त्यांनी वणीकरांची निराशाच केली होती. शहरात अवैध धंद्यात झालेली वाढ, शहरात चोऱ्यांचे प्रमाण यावर त्याना आवर घालता आले नाहीं. म्हणून नियंत्रण नसल्याचे आरोप महल्ले यांच्यावर झाले होतें. त्यातच ठाण्यातच पोलीस कर्मचा-यांची हाणामारी असे अनेक प्रकरणही झाले दरम्यान त्याच काळात पत्रकारावर चोरट्याने भीषण हल्ला केला होता त्यातच शहरातील प्रतिष्ठित डॉक्टराने महल्ले यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप झाले . मग काय अखेर त्यांची बदलीही करण्यात आली . ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांना 14 ऑक्टो. 2022 रोजी मेडीकल लिववर पाठविण्यात आले होते. तेव्हापासून पोलीस स्टेशनचे प्रभार API माया चाटसे सांभाळत होत्या. शहरात वाढती गुन्हेगारी बघून आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी पोलिस महानिरीक्षक यांना फोन करून वणी पोलीस ठाण्यात लवकरात लवकर ठाणेदाराची नियुक्तीची मागणी केली होती. शेवटी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पदावर काम केलेले वणी पोलीस स्टेशनला ठाणेदार म्हणून पीआय प्रदीप शिरस्कर मिळाले व त्यांनी 6 महिने या ठाण्याचा सांभाळ करीत केलें. अत्यंत साधे, मनमिळावू स्वभावाचे पीआय वणी ठाण्याला लाभले होते. त्यांचा कार्यकाळात वणी ठाण्यात दर शनिवारी तक्रार निवारण दिन सुरू केले. त्यात आपसी तळजोड त्यांनी जवळपास 400 ते 500 केलें. अनेक धडाकेबाज कारवाया केल्या. अनेक मोठ मोठ्या गुन्हातील आरोपींचा मुसक्या दाबल्या व अनेक आरोपींना जेरबंद केले. विशेष यांचा कार्यकाळात जिल्हा पोलिसांना हातात तूरी देऊन पसार होणाऱ्या “गब्या”… सारखा कुख्यात आरोपीला याच ठाणेदाराने जेरबंद केले. तसेच घरफोडी सारखे अनेक गुन्हे यांनी उघडकीस आणले. विशेष यांचा मार्गदर्शनात डी.बी पथकही उभारण्यात आले व त्यांनी देखील अत्यंत चांगली कामगिरी करून अनेक गुन्हे उघडकीस आणलें. तसेच वणी ठाण्यात अनेक उपक्रम राबविले त्यात भरपूर प्रतिसादही मिळाला. पीआय प्रदिप शिरस्कर यांनी कर्मचारी यांना परिवारातील “एक सदस्य” म्हणूनच त्यांच्याशी वागणुक ठेवली हे विशेष… काहीं दिवसातच आपले बनलेले अधिकारी यांचा बदलीने ठाण्यातही भावूकता दिसून आली. ” अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याशी कसे वागावे ? असाही धडा त्यांनी शिकवला असेही म्हणायला काहीच हरकत नाहीं. अश्यातच बुधवार रात्री 10.वाजता जिल्हा पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या यादीत त्यांना बदलीचे आदेशच धडकल्याने कर्मचारी यांना शॉकच बसला.
महाराष्ट्र पोलीस कायदा मधील कलम २२ न (१) व (२) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करुन परिक्षेत्रीय पोलीस आस्थापना मंडळाने जिल्हयातील विहीत कालावधी पूर्ण झालेल्या पोलीस निरिक्षकांची बदली करण्यात आली आहे.आता हा हेविवेट ठान्यावर कोणाची नजर आहे हे बघणे अत्यंत गरजेचे…. पण नव्याने रूजू होणारे ठाणेदार अशाच प्रकारे कामगिरी करतील अशी आशा वणीकर जनतेला लागली आहे.