•शांत स्वभावाचे व रॉयल ठाणेदार म्हणून विशेष ओळख.
अजय कंडेवार,वणी:- महाराष्ट्र पोलीस कायदा मधील कलम २२ न नुसार जिल्हा पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी बदल्या करण्यात आल्या होत्या.अश्यात तत्कालीन ठाणेदार म्हणून येथे रूजू असलेले प्रदिप शिरस्कर यांच्या ठिकाणीं प्रशासकीय बदली म्हणून वणी येथील हेविवेट ठाण्यात ठाणेदार म्हणून मुकुटबन ठाण्याचे P.I अजित जाधव यांची वर्णी लागली आहे.
वणी शहरात घरफोडी, दुकानफोडी व चोऱ्यांचे सत्र सुरु झाले आहे. शहरात अज्ञात चोरट्याने काही दिवसापूर्वी एकाच रात्री जवळपास अनेक दुकाने फोडली.त्यामुळे शहरात परत चोरट्यांची दहशत निर्माण झाली होती. मधातच 6 महिण्याअगोदर P.I प्रदिप शिरस्कर यांची ठाण्यात बदली होताच चोरीच्या घटनांत व अनेक गुन्हे मोठ्या प्रमाणात अंकुश लागला होता.
आता वणी येथे मुकूटबन ठाणेदारपदी P.I अजित जाधव यांची वर्णी लागताच आणखी गुन्हे कमी होण्याचे चिन्ह दिसू लागले कारण मुकुटबन येथील शांत स्वभावाचे व रॉयल ठाणेदार म्हणून चांगलीच छाप सोडली आहे आता वणी येथील अनेक अवैध धंदे,चोऱ्या व गुन्हे यावर आवर घालण्याचे आवाहन त्यांचा समोर आहे. आता येणारा काळच सांगेल की,P.I. जाधव या आव्हनाला तोंड देईल.कारण मुकुटबन येथे असताना अनेक अवैध धंदे यावर अंकुश लावण्यात यश आले. त्यांचे नावच त्यांचा कामाची पावती आहे यात काही संशय नाहीच.