•लालपुलिया परिसरात अवैध कोळसा ट्रकांवर वाहतूक शाखा आळा घालणार की चालू देणार ?
अजय कंडेवार,वणी:– तालुक्यातल्या अपघातांचं आणि अपघातातल्या मृत्यूचं प्रमाण अतिशय चिंताजनक आहे. दररोज येणाऱ्या भीषण अपघातांच्या बातम्या काही केल्या थांबत नाहीत.
विशेष वणी, मारेगाव अपघातांची मालिका पाहायला मिळत आहे. या वाढत्या अपघातांमुळे मागिल काही महिन्यात गंभीर स्वरूपात अनेक अपघात झाले असून त्यात अनेक युवक व वयोवृद्ध व्यक्तीना आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष मागील वर्षाच्या तुलणेेने अपघाताचा आलेख वाढत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.त्यामुळे वाहनचालकांना ‘अति घाई, संकटात नेई’ची आठवण करून देण्याची वेळ वाहतूक शाखेवर आली आहे.


वणी उपविभागात काही भागात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. काही भागात डागडूजी करून खड्डेही भरून घेण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनांचा वेग वाढला अाहे. परिणामी, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. यात सर्वाधिक अपघात हे दुचाकीचे आहेत.


वाहनांची समोरासमोर धडक बसल्याने झालेले अपघात यात जास्त आहेत. त्यात बांधकाम विभाग मूंग गिळून का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे व वाहतूक शाखा याकडे काय करेल अशीही बोंब वणी उपविभागात होत आहे. त्यामुळे अपघातामुळे काहींना कायमचे अपंगत्वही आलेले आहे. त्यामुळे वाढत्या वेगाला लगाम घालण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. आता याकडे बांधकाम विभाग व वाहतूक शाखा काय करेल याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे.