वणी:- वणी शहरात DYSP सुरेश दळवे यांच्या नेतृत्वाखाली वणी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत सात धाडी टाकत जुगार माफियांना थेट जमिनीवर आणले आहे. चार ठिकाणी एकाचवेळी घाव घालत पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला आहे. “वणी उपविभागात आता अवैध धंद्यांना थारा नाही!”
DYSP सुरेश दळवे हे केवळ कारवाई करत नाहीत, तर मुळासकट उखडून फेकण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. “समूळ नष्ट करा” या ठाम आदेशानंतर वणी पोलिसांचा ॲक्शन मोड पूर्ण ताकदीने सुरू झाला असून, मटका चालवणाऱ्यांचे जाळे उध्वस्त करण्याचा निर्धार दिसून येतो आहे.
दिनांक ३० जानेवारी आणि ३१ जानेवारी रोजी या दोन दिवसांत सात मटका जुगार अड्यांवर जबरदस्त At a time धाड टाकण्यात आली.यात भाजी मंडी परिसरात टाकलेल्या धाडीत मटका साहित्य व रोख रक्कम जप्त करत आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर सिद्धी कॉलनी, शास्त्री नगर, पंचशील नगर, दीपक चौपाटी परिसर अशा संवेदनशील भागांत सलग कारवाया करत पोलिसांनी मटका चालकांची झोप उडवली. प्रत्येक धाडीमागे DYSP सुरेश दळवे यांचे कडक नियोजन आणि झिरो टॉलरन्स धोरण ठळकपणे जाणवले.या धडाकेबाज मोहिमेत सपोनि दत्ता पेंडकर, सपोनि मिलींद सरकटे पोउपनि सुळे, झाडे, महापुरे, तसेच पोहेका विजय वानखेडे, सुधीर पांडे, प्रदीप, मुकेश खरपते, अतुल पायघन, प्रविण वारंजे, सुनिल नलगंटीवार यांच्या पथकाने निर्णायक कारवाई केली. यांच्यासह संपूर्ण पोलिस पथकाने जुगार अड्ड्यांवर वज्राघात केला. वणीकरांमध्ये आता एकच चर्चा आहे.
या आरोपींवर झाली कारवाई…..
सिद्धी कॉलनी परिसरात अपराध क्रमांक २०६७/२०२६ अंतर्गत कारवाई करून ₹५,११०/- रोख व मटका साहित्य जप्त करण्यात आले. आरोपींमध्ये अब्दुल मजर अब्दुल बशीर (वय ३६, मोमीनपुरा, वणी), शेख सलमान अब्दुल गफार (वय ३४, शास्त्री नगर, वणी), दिलीप बंडुजी चौधरी (वय २९, दामले फैल, वणी) तसेच मालक हरीश कापसे (रा. वणी) यांचा समावेश आहे. पुढे अपराध क्रमांक ३०६८/२०२६ अंतर्गत ₹३,०७०/- रोख जप्त करत सलमान रऊफ खान पठाण (वय २६), रोहीतकुमार शाहू (वय २२) आणि मालक शेख अनीस शेख (वय ३०, पंचशील नगर, वणी) यांच्यावर कारवाई करण्यात आली.

