•मंदिराचे अध्यक्ष रवि बेलुरकर यांच्या पुढाकार.
अजय कंडेवार वणी : यंदाच्या नवरात्र महोत्सवात वणी येथील नवशक्ती दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथील समितीने महाराष्ट्रतील यवतमाळ जिल्हा माहुरगड येथील 51 जागृत शक्तीपीठापैकी एक श्री रेणुका देवीची अखंड ज्योत प्रज्वलित करुन ती वणी नगरीत आणण्याचा निर्धार नवशक्ती दुर्गा माता मंदिराचे अध्यक्ष रवि बेलुरकर यांनी केला आहे.
दुर्गा माता मंदिराचा जिर्णोध्दार झाला असुन या नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी भक्तांसाठी भव्य मंदिर खुले केले जाणार आहे. व रेणुका मातेची अखंड ज्योत आणून मंदिराचे लोकार्पण व विवीध कार्यक्रमांनी नवरात्र उत्सव साजरा केला जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून या नवरात्रात दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम म्हणून माहुरगड येथील रेणुका माताची अखंड ज्योत प्रज्वलित करून घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर दि.15 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 4 वाजता या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. व सायंकाळी 5 वाजता वणी नगरीत आल्यावर मोठ्या जल्लोशात या ज्योत यात्रेचे स्वागत करुन ती अखंड ज्योत दुर्गा माता मंदिरात भक्तांनाच्या दर्शनासाठी ठेवली जाणार आहे. हीअखंड ज्योत आणण्यासाठी ज्योत यात्रेत समितीचे अध्यक्ष रवि बेलुरकर यांच्या सोबत दौलत वाघमारे, प्रमोद लोणारे, चंदन मोहुले, नितीन बिहारी,राजकुमार अमरवानी, शिवा आसुटकर, पुरुषोत्तम मांदळे, अमोल बदखल, राजेंद्र जयस्वाल, स्वपनिल बिहारी,मारोती गोखरे,या अखंड ज्योत यात्रेचे स्वागत करण्यासाठी दुर्गा माता मंदिर समितीचे सर्व सदस्य,वणीकर नागरिक मोठेया संख्येने उपस्थित राहणार आहे.