सुरेंद्र इखारे,वणी – येथील पोलीस स्टेशन अंतर्गत वसंत जिनिग हॉल येथे दिनांक 23 सप्टेंबर 2922 रोज सायंकाळी 7.00 वाजता वणी उपविभागाची आगामी नवदुर्गा,शारदा उत्सव, विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिन, रावण दहन, ईद ए मिलादुन्नबी या धार्मिक सण उत्सवाच्या पार्शवभूमीवर ” समन्वय व सुसंवाद ” सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेचे अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील हे होते. प्रमुख उपस्थिती उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजजलवार, ठाणेदार रामकृष्ण महल्ले, नायब तहसिलदार खिरेकर, मुख्याधिकारी अभिजित वायकोस, एम एस इ बी अभियंता, विस्तार अधिकारी प स , सहायक पोलीस निरीक्षक जाधव, सपोनी गजानन करेवाड, सपोनी माया चाटसे मॅडम, सपोनी संगीता हेलोंडे मॅडम, उपस्थित होते. या सभेचे प्रास्ताविक वणी ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांनी केले. याप्रसंगी डॉ दिलीप भुजबळ पाटील यांचे हस्ते नायब तहसिलदार खिरेकर, मुख्याधिकारी अभिजित वायकोस, विस्तार अधिकारी प स , टी डी आर एफ जवान मुस्कान शेख, प्रयोगशील विज्ञान शिक्षक विलास जाधव यांच्या शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मान्यवरांचे उपस्थितीत राकेश खुराणा, मंगल तेलंग, संजय लव्हाळे, नारायण गोडे ,वंदना आवारी यांनी मनोगत व्यक्त करत वणी शहराच्या आवश्यक बाबींकडे पोलीस अधीक्षकांचे लक्ष वेधले.
तेव्हा अध्यक्षस्थानावरून डॉ दिलीप भुजबळ पाटील म्हणाले संपूर्ण जिल्ह्यात आगामी सण उत्सव आहे. यात यवतमाळ जिल्ह्यात 778 दुर्गादेवी बसत असून एकट्या वणी शहरात तर सर्वात जास्त 253 हा आकडा मोठा असल्याने सण उत्सवात पोलीस प्रशासनासाठी मोठे आवाहन आहे .यासाठी सूक्ष्म नियोजनाची आवश्यकता आहे यासाठी समनव्य व सुसंवादातून चर्चा करण्यासाठी आलो आहे. परंतु आपण नेहमी सांगत असता वणी शांत आहे .निश्चिनंत राहा असे सांगत आले परंतु दुसरी बाजू अशी आहे की, वणीकरांचे कौतुक करावे तेवढेच कमी आहे .आपल्या समस्या पूर्णत्वास नेण्यासाठी कटिबद्ध आहे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार करणसिंग राजपूत यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी ए.एस.आय शेखर वांढरे, शिपाई आत्राम, व शिरपूर, मुकुटबन, पाटण, मारेगाव येथील सर्व कर्मचारी वर्गांचे सहकार्य लाभले.