अजय कंडेवार,वणी:– जमीर खान यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून आशियाना हॉल, मोमीनपुरा , वणी येथे दि.30 डिसे. शनिवार रोजी मुस्लिम वधू-वरांचे २१ जोडप्यांचे ‘ निकाह’ आयोजित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून हंसराज अहिर,आमदार वणी विधानसभा संजीवरेड्डी बोदकुरवार , अध्यक्ष वफ्फ बोर्ड महाराष्ट्र राज्य आ. डॉ. वजाहत मिर्जा,आमदार वरोरा विधानसभा प्रतिभाताई धानोरकर,माजी आमदार वणी विधानसभा वामनराव कासावार,माजी आमदार वणी विधानसभा विश्वास नांदेकर , नेते मनसे राजुभाऊ उंबरकर, अध्यक्ष वणी नागरी सह. बैंक लि.संजय देरकर , यवतमाळ जिल्हाध्यक्ष भाजपा तारेंद्र बोर्ड ,प्रदेश कार्य सदस्य भाजपा विजय चोरडीया,नेते, आम आदमी पार्टी भाई अमान ,अध्यक्ष व्यापारी असोसीएशन, वणी राकेश खुराणा,अध्यक्ष रंगनाथ स्वामी नागरी सह पत संस्था अॅड. देवीदासजी काळे, सेव्हन स्टार,वणी फारुख हारुण चिनी,विस्तारक चंद्रपूर लोकसभा भाजपा रविभाऊ बेलूरकर सर्व उपस्थित राहणार आहे
या यशस्वितेसाठी येथील जमीर खान ऊर्फ जम्मुभाई, हाजी रफिक शेख ईब्राहीम, रज्जाक पठाण, हाजी असलम चिनी, मो. एजाजभाई, बबलू दिवाणजी, हाजी निसार अहेमद, हाजी ईसराईल खाँ शाबान खाँ, अकरमभाई,डॉ. शाह अरशद ईकबाल, डॉ. सैय्यद अतीक, अशफाक खॉ. मेहबुब खाँ, अनवर हयाती, मुन्ना खॉन, साकीब ईकबाल खान ,सुलेमान खान, हबीबभाई, शाहीद शमशेर खॉन, सैय्यद मतीनभाई, यांच्यासह समाजबांधव अथक परिश्रम घेत आहेत.