Thursday, October 22, 2026
HomeBreaking Newsवणीत भाजपाचा हव्वा ‘गुल’ होण्याची संकेत....?

वणीत भाजपाचा हव्वा ‘गुल’ होण्याची संकेत….?

•राजकारणात मोठा धक्का बसण्याची चिन्हे.

Ajay Kandewar,Wani:- नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर वणीच्या राजकीय पटावर मोठी हालचाल सुरू असून भाजपासाठी परिस्थिती दिवसेंदिवस प्रतिकूल होताना दिसत आहे. शहरात वणीत उबाठाच्या जोरदार शक्तिप्रदर्शनाने राजकीय समीकरणांची अक्षरशः मोडतोड केली आहे. त्यातच शिंदे गटाचे प्रदेशस्तरीय नेतृत्व अचानक सक्रिय होत भाजपाची कंबर तोडण्यास सज्ज झाल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

शहरात दोन्ही शिवसेना गटांची रणनिती आता एकाच दिशेने फिरताना दिसत असून “विरोधक एकत्र – भाजप अडचणीत” अशी स्पष्ट राजकीय हवा निर्माण झाली आहे. मध्यनगरपासून उपनगरापर्यंत भाजपाच्या प्रचारात रंगत आणण्याचे प्रयत्न सुरू असले तरी मतदारांमध्ये मात्र “फक्त हवा, काम नाही” अशी सूचक कुजबुज वाढत चालली आहे.

स्थानिक कार्यकर्त्यांचा उत्साह, जनतेचा ओढा आणि विरोधकांची एकजुट पाहता यंदाच्या निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसण्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. शहरातील बदललेल्या समीकरणांमुळे भाजपाच्या ‘अजेय’ प्रतिमेवर तडा गेला असल्याचे राजकीय तज्ज्ञही मान्य करत असून “वणीमध्ये भाजपाचा हव्वा यंदा अखेर गुल” असा माहोल तयार झाला आहे.एकूणच, वणी नगरपरिषद निवडणुकीत यंदा भाजपासाठी परिस्थिती गंभीर – आणि विरोधकांसाठी संधी मोठी.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page