•पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक 30 बैलजोड्या उपस्थित
•आज विदर्भाच्या कानाकोपर्यातील बैलजोड्याचे आगमन
अजय कंडेवार,वणी : शहरात 26 वर्षानंतर प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या जंगी शंकरपटाचे मंगळवार 20 रोजी उद्घाटन झाले. यावेळी भरउन्हात शेतकर्यांसह आबालवृद्धांचा उत्साह ओसंडून वाहत होता..वणी 26 वर्षांनंतर प्रथमच ही स्पर्धा रंगणार असल्याने वणी आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा थरार अनुभवावा, असे आवाहन आयोजक संजय खाडे यांनी केले ही होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समिती व संजय खाडे मित्रपरिवार परिश्रम घेत आहे.
संजय खाडे यांच्या पुढाकाराने व मित्र परिवाराचा वतीनेआयोजित शंकरपट कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले मा.आमदार वामनराव कासावार हे होते तर उद्घाटन सोहळ्याला उद्घाटक म्हणून .आमदार राजू तीमांडे,प्रमुख अतिथी देविदासजी काळे अध्यक्ष रंगनाथस्वामी नागरी सह पतसंस्थाआयोजन समितीचे सदस्य प्रा.श्री. शंकर व-हाटे, नरेंद्र ठाकरे, श्री. राजामার पाषडकर, सौ.अरूणाताई खंडाळकर, श्री. प्रमोद वासेकर, श्री. संजय निखाडे उपजिला प्रमुख शिवसेना, श्री. पुरुषोत्तम आवारी, श्री. राजेंद्र गायकवाड, जिल्हा प्रमुख सेना.व प्रमुख अतिथी म्हणून मोठ मोठ्या मान्यवरांची उपस्थिती होती.याप्रसंगी तीमांडे यांनी शहरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या शंकरपटाचं कौतुक करीत आयोजन समितीचे आभार व्यक्त केले. तालुक्यातील बळीराजासाठी हा शंकरपट पर्वणी ठरणार असून नागरिकांनी शंकरपटाचा आनंद घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. बुधवारी सकाळी पुन्हा नव्या जोमाने नव्या दमाने विदर्भाच्या कानाकोपऱ्यातील बैलजोड्या धावणार आहेत हे विशेष..